समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे उद्धाटन रखडले; नेमके काय झाले ? वाचा

701 किमीच्या समृद्धी महामार्गाचा शेवटचा 76 किमी टप्पा पूर्ण झाल्यानंतरही उद्घाटन रखडले आहे.यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, लवकरात लवकर उद्घाटनाची तारीख जाहीर करण्याची मागणी होत आहे.

Published on -

Maharashtra Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी व उपराजधानीला जोडणाऱ्या बहुचर्चित हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची चर्चा गेल्या अनेक दिवासांपासून सुरु आहे. तब्बल 701 किलोमिटर लांबीच्या या महामार्गाचा पहिला टप्पा तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2022 साली सुरु करण्यात आला. आता शेवटच्या म्हणजेच 76 किलोमिटर लांबीच्या टप्प्याचे कामही पूर्ण झाले असून, त्याचे उद्घाटन मात्र रखडले आहे. हे उद्धाटन कधी होणार? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

महाराष्ट्राचा स्वप्नवत मार्ग

समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये खुला करण्यात आला होता. तेव्हापासून नागरिकांनी उर्वरित मार्गाच्या उद्घाटनासाठी वाट पाहिली. या मार्गामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर कमी वेळात पार करता येत आहे. आता इगतपुरीपासून पुढे अमणेपर्यंतचा मार्ग रखडला होता. हा मार्ग दुर्गम पर्वतीय भागातून जात असल्याने त्याच्या बांधकामाला वेळ लागला. MSRDC कडून हे 76 किलोमिटरचे कामही आता पूर्ण झाले आहे.

कधी होणार उद्धाटन

राज्याच्या स्वप्नवत समजल्या जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा इगतपुरी ते अमणे पूर्ण झाला आहे. ७६ किमी लांबीचा हा महत्त्वाचा टप्पा ७०१ किमी लांब महामार्गाचा शेवटचा भाग आहे. त्याचे उद्घाटन १ मे रोजी होणार असल्याचे संकेत होते. मात्र, प्रतिक्षेचा शेवट यावेळी झाला नाही. या महार्गाचे उद्धाटन पुन्हा रखडले.

उद्धाटन का रखडले

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव उद्घाटन पुढे ढकलण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण होईल, अशी चर्चा होती. मात्र, ती केवळ चर्चाच राहिली. आता हे उद्धाटन लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे.

वाहनचालकांना मनस्ताप

या शेवटच्या टप्प्याचे उद्धाटन रखडल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता वाहनचालकांचा संयम सुटत चालला आहे. सध्या नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांना अजूनही जुना मुंबई-नाशिक मार्ग वापरावा लागत आहे, ज्यामुळे वेळ व इंधनाचा खर्च वाढतो आहे. उद्घाटनाची नवी तारीख अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेली नसल्याने ती लवकर जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe