मुंबई लोकलही धावणार अंडरग्राऊंड; ‘या’ मार्गावर सुरु होतोय 3 हजार कोटींचा ड्रिम प्रोजेक्ट

Published on -

जमिनीखालून मेट्रो सुरु करण्याचा ड्रिम प्रोजेक्ट यशस्वी झाला. त्यामुळे आता पुन्हा अंडर ग्राऊंड लोकल ट्रेनचीही चर्चा सुरु झाली आहे. मध्य रेल्वेने मुंबईतील उपनगरीय रेल्वे वाहतुकीचं जाळं विस्तारण्याचा आणि अधिक आधुनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईमधील परळ अथवा करी रोड येथून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान पाचव्या आणि सहावी मार्गिका तयार करण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे. या मार्गिका जमिनीखाली उभारण्यात येणार असल्याचं वृत्त काही मिडिया हाऊसने दिले आहे.

काय आहे नेमका प्रकल्प?

मुंबईमधील उपगनरीय रेल्वे गाड्यांची वाढती वाहतूक आणि प्रवासी संख्येमुळे येणार ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे. मुंबईतील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे पहिल्या टप्प्याचं काम सुरु झाले आहे. कुर्ला ते परळ या 10.1 किलोमीटरच्या अंतराचा हा टप्पा आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्या कुर्ला-परळ- सीएसएमटी या मार्गिकेवर असणार आहे. ते 7.4 किलोमीटर लांबीचे असेल.

जमिनीखालून जाणार काम?

मुंबईत अंडरग्राऊंड मेट्रोचा प्रोजेक्ट यशस्वी झाला. त्यामुळे आता लोकल रेल्वेचा प्रोजेक्टही अंडग्राऊंड करण्यावर रेल्वे प्रशासन कामाला लागले आहे. आमच्याकडे सर्व परवानग्या, परळ आणि सीएसएमटी स्थानकाजवळ बोरिंग मशिनने बोगदा खोदण्यासाठी आवश्यक असलेली जमीन अशा साऱ्या गोष्टी आहेत. याबद्दल अंतिम अभ्यासानंतर निर्णय घेतला जाईल. एकदा जमिनीखाली मार्ग सापडला की आम्ही तो बोगदा सीएसएमटी येथ संपणार अशी रचना करुन काम सुरु करु,” असं वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.

किती येणार खर्च

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन, मध्य रेल्वे यासंदर्भात निर्णय घेणार आहे. हा मार्ग उभारण्यासाठी 3 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नेमकं कोण हे काम करणार याबद्दल कोणतीही स्पष्टता अद्याप नाही. या प्रकल्पाचा अंतिम निर्णय सविस्तर अहवालानंतर घेतला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe