Pune Railway : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अगदीच आनंदाची आणि आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि यामुळे विविध रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.
उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक जण आपल्या मूळ गावाकडे परतत आहेत तर काहीजण पिकनिकसाठी बाहेर पडत आहेत. अशा स्थितीत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि या अतिरिक्त गरजेच्या पार्श्वभूमीवर आता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. दरम्यान असे सारे परिस्थिती असतानाच पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे लवकरच पुणे रेल्वे स्थानकावरून एक उन्हाळी विशेष गाडी चालवली जाणार आहे. बेंगलोर ते गोरखपुर दरम्यान ही विशेष गाडी चालवले जाणार असून ही समर स्पेशल ट्रेन आपल्या महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातून धावणार आहे.
या गाडीला पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. यामुळे पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीत सुद्धा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
बेंगलोर गोरखपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन (ट्रेन क्रमांक 06529) बंगलोरच्या सर एम. विश्वेश्वराया टर्मिनल येथून 12 , 19 आणि 26 मे 2025 रोजी सोडली जाणार आहे आणि ही गाडी तीन दिवस आणि अकरा तासांचा प्रवास करून म्हणजेच चौथ्या दिवशी सकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी गोरखपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर गोरखपूर बेंगलोर विशेष एक्सप्रेस ट्रेन ट्रेन क्रमांक (06530) 16 23 आणि 30 मे 2025 रोजी गोरखपूर रेल्वे स्थानकावरून सोडले जाणार आहे आणि ही गाडी तीन दिवस आणि पंधरा तासांचा प्रवास करून म्हणजेच चौथ्या दिवशी सकाळी सव्वा आठ वाजता बेंगलोर येथील सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल येथे पोहोचणार आहे.
विशेष गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
बेंगलोर ते गोरखपुर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या या उन्हाळी विशेष गाडीला महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या स्थानकांवर ही गाडी थांबणार असल्याने या गाडीचा महाराष्ट्रातील नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. ही विशेष गाडी या मार्गावरील पुणे, मनमाड, भुसावळ, खंडवा, राणी कमलापति, बीना, झांसी, उरई, प्रयागराज, वाराणसी, मऊ अशा महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती संबंधितांकडून प्राप्त झाली आहे.