प्रा.राम शिंदेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले खडसेंचा विषय…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. नुकतेच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भाजपाला धक्का बसला आहे.

दरम्यान भाजपचे कोणीही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या संपर्कात नाही. आमच्यासाठी खडसेंचा विषय आता भूतकाळ झाला आहे. भाजपसाठी हा विषय संपला आहे, असे वक्तव्य मंत्री राम शिंदे यांनी केले.

शहरातील शासकीय विश्रामगृहावर भाजप कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी शिंदे बोलत होते. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते व मोनिका राजळे,

उपस्थित होते. शिंदे म्हणाले, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे मोबदला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. राज्यात भाजप सरकार असताना, शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते.

मात्र, त्यावेळी एवढे मोठे नुकसान झालेले नव्हते. त्यामुळे आघाडी सरकारने जाहीर केलेली 10 हजार कोटींची मदत तुटपुंजी आहे. ही रक्कम वाढविली पाहिजे असे शिंदे म्हणाले.

दरम्यान, पक्षांतरानंतर एकनाथ खडसे सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार असल्याने त्यांना राष्ट्रवादीने फोडले, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

ते म्हणाले , ‘ प्रा. शिंदे यांना भाजपात मीच प्रवेश दिला असून ‘ओ अभि बच्चा है’ . राम शिंदे हे प्राध्यापक आहेत. त्यांना भाजपात मी घेतले होते. त्यांच्या आमदाराकीच्या तिकीटासाठी मी प्रयत्न केले. त्यासाठी शिफारसही मी केली असल्याचे खडसे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment