700 एकराचा परिसर, 36 किलोमिटरची भिंत… ‘या’ किल्ल्यावर सती गेल्यात 50,000 महिला

Published on -

महाराष्ट्राला जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा व गड-किल्ल्यांचा इतिहास आहे, तसाच भारतातील अनेक राज्यांनाही आहे. भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता, हा प्रश्न कुणी विचारला तर आपण शिवाजी महाराजांचे किल्ले आठवायला लागतो. परंतु राजस्थानमधील चित्तोडगड किल्ला हा भारतातील सर्वात मोठा किल्ला आहे, हे अनेकांना माहित नसेल. हा किल्ला तब्बल 700 एक जागेवर बांधला गेला आहे. त्याची भिंत 36 किलोमिटर लांब आहे.

कसा आहे किल्ला?

चित्तौडगड किल्ला हा भारतातील सर्वात मोठा किल्ला आहे. तो राजस्थानमधील चित्तौडगड येथे आहे. याला राजस्थानचा अभिमान आणि राजस्थानातील सर्व किल्ल्यांचा राजा असेही म्हणतात. सुमारे 700 एकर जागेवर पसरलेल्या चित्तोड किल्ल्याला 2013 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले.

कुणी केले राज्य?

या किल्ल्यावर वेगवेगळ्या काळात अनेक राजांनी राज्य केले आहे. 8 व्या शतकात गुहिल राजवंशाचे संस्थापक राजा बप्पा रावल यांचे राज्य होते. ज्यांनी मौर्य राजवंशातील शेवटचा शासक मनमोरी याचा पराभव करून हा किल्ला ताब्यात घेतला. यानंतर परमार आणि सोलंकी घराण्यांनीही राज्य केले. त्यावर अनेक परकीय आक्रमणे झाली.

कसा आहे किल्ला?

सुमारे 180 मीटर उंचीवर असलेल्या या किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक खांब, स्मारके आणि मंदिरे आहेत. विजय स्तंभाव्यतिरिक्त, येथे 75 फूट उंच जैन कीर्ती स्तंभ देखील आहे. तो 14 व्या शतकात बांधला गेला होता. त्याच्या जवळच महावीर स्वामींचे मंदिर आहे. थोडे पुढे नीलकंठ महादेवाचे मंदिर आहे. पदण पोळ, भैरव पोळ, हनुमान पोळ, गणेश पोळ, जोडला पोळ, लक्ष्मण पोळ आणि राम पोळ या दरवाज्यातून प्रवेश केल्यावर किल्ल्यात पोहोचता येते. इथे असलेल्या प्रत्येक दरवाजाची एक वेगळीच कहाणी आहे.

सती गेल्यात अनेक राण्या

हा महान किल्ला महिलांसाठी मुख्य जौहर ठिकाण देखील मानला जातो. येथील पहिला जौहर 13 व्या शतकात राजा रतन सिंह यांच्या कारकिर्दीत अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमणादरम्यान राणी पद्मिनीच्या नेतृत्वाखाली झाला. राणी पद्मिनी आणि तिच्या 16,000 दासींनी विजय स्तंभाजवळ स्वतःला जिवंत जाळून आत्महत्या केली होती. याशिवाय 16 व्या शतकात राणी कर्णावतीने 13,000 महिलांसह येथे जौहर केले. काही वर्षांनंतर राणी फुलकंवरने हजारो महिलांसह येथे जौहर केले. ही भारतीय इतिहासातील एक प्रमुख घटना आहे.

कुणी बांधला किल्ला

हा किल्ला कोणी आणि केव्हा बांधला याबद्दल अचूक माहिती उपलब्ध नाही. काही इतिहासकारांच्या मते हा किल्ला सातव्या शतकात मौर्य राजवंशातील राजा चित्रांगद मौर्य यांनी बांधला होता. एका आख्यायिकेनुसार, हा किल्ला पांडवांनी बांधला होता, असेही सांगितले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News