‘ही’ आहेत मुंबईतील टॉप 5 इंजीनियरिंग कॉलेज ! इथं ऍडमिशन मिळालं म्हणजे तुमचं करिअर सेट

बारावीच्या निकालानंतर आता विद्यार्थी पुढील वर्गातील प्रवेशासाठी लगबग करत आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बहुतांशी विद्यार्थी इंजिनिअरिंग करण्याच्या तयारीत आहेत आणि अशाच विद्यार्थ्यांसाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण राजधानी मुंबईमधील टॉप पाच इंजिनिअरिंग कॉलेज बाबत माहिती पाहणार आहोत.

Updated on -

Top Engineering Colleges : बारावीनंतर इंजीनियरिंगला ऍडमिशन घेण्याच्या तयारीत आहात का? अहो, मग आजची ही बातमी तुमच्याच कामाची आहे. खरंतर राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल जाहीर केलाये. पाच मे 2025 रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला असून आता विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहेत.

बारावीनंतर लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्याच्या तयारीत आहेत आणि जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर आज आम्ही तुम्हाला मुंबईमधील टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती सांगणार आहोत.

मुंबईतील टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेज 

IIT Bombay : इंडियन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी मुंबई हे मुंबईतील टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेज पैकी एक. NIRF च्या ऑल इंडिया रेटिंगमध्ये हे कॉलेज तिसऱ्या स्थानी आहे.

त्यामुळे जर तुम्हाला मुंबईत इंजीनियरिंग करायची असेल तर तुम्ही या कॉलेजला प्राधान्य देऊ शकता. या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाल्यास तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी  : या यादीत इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई या कॉलेजचा दुसरा क्रमांक लागतो. जर तुम्हाला मुंबईत इंजीनियरिंग करायची असेल तर तुम्ही या कॉलेजचा सुद्धा विचार करू शकता. NIRF च्या ऑल इंडिया रेटिंग मध्ये हे कॉलेज 41 व्या स्थानी आहे.

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट : VJTI मुंबई हे महाराष्ट्रातील एक प्रमुख इंजीनियरिंग कॉलेज. मुंबईतील या कॉलेजमध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

जर तुम्हालाही इंजीनियरिंग करायची असेल तर तुम्ही या कॉलेजला प्राधान्य देऊ शकता. महत्त्वाची बाब म्हणजे या कॉलेजची फी फक्त 60 हजार रुपये एवढी आहे.

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग : मुंबईतील टॉप पाच कॉलेजमध्ये भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या कॉलेजचाही समावेश होतो. जर तुम्हाला इंजीनियरिंग करायची असेल तर तुम्ही भारती विद्यापीठाला नक्कीच प्राधान्य देऊ शकता. NIRF च्या ऑल इंडिया रँकिंग मध्ये या कॉलेजला 151-200 मध्ये स्थान देण्यात आले आहे.

सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी : सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे मुंबईतील एक महत्त्वाचे इंजिनिअरिंग कॉलेज असून या कॉलेजमध्ये राज्यातील आणि राज्याबाहेरील अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत. यामुळे जर तुमचाही बारावीनंतर इंजिनिअरिंगचा प्लॅन असेल तर तुम्ही या कॉलेजचा विचार करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe