वर्षभरात मी गुंडगिरीला आळा घातला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-निलेश लंके अशिक्षित आहे. निवडून आल्यानंतर तालुक्यात गुंडगिरी, दादागिरी वाढेल अशी टीका सुशिक्षित व अभ्यासू म्हणवून घेणारे आपल्यावर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान करत होते.

परंतु निवडून आल्यानंतर तालुक्यातील गुंडगिरी व दादागिरीला आळा बसला आहे तर गल्लीतील दादा समजणारेच आता बिळात घुसून बसले आहेत असे सुतोवाच आ. लंके यांनी केले. भाळवणी येथील बाजारतळावर निलेश लंके यांच्या आमदारकीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल येथील राष्ट्रवादी काँग्रेस,

काँग्रेस व निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार व लाडूतुलाचा कार्यक्रमात ते बोलत होते. आ. लंके म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सरकार स्थापनेला थोडासा उशीर झाला. त्यात कोरोनाच्या महामारीमुळे संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले. लोकांच्या जगण्यामरणाची धडपड सुरू झाली.

हे सर्व सुरू असताना स्वस्थ न बसता प्राधान्याने गोरगरीब जनतेसाठी अन्नदानाचा कार्यक्रम हाती घेतला. तसेच कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडलेल्या रूग्णांना कोणताही आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून तालुक्यात कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले. त्याठिकाणी रूग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

त्यात सर्वांचे सहकार्य मिळाले. या  सर्व धावपळीत वर्षातील फक्त चारच महिने विकासाच्या कामांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी मिळाले. मतदारसंघातील लहानथोर तसेच महिला माता – भगिनींच्या पाठबळावर व आशीर्वादाने जनतेची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.

जनता दरबाराच्या माध्यमातून पोलिसांना सुचना देऊन तालुक्यातील गुंडगिरीला पायबंद घातला असून गल्लीबोळातील दादागिरी करणारे आता बिळात घुसून बसले आहेत असेही ते म्हणाले. सध्याचे कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने विकासाच्या कामांना गती मिळेल.

के.के. रेंजच्या रेड झोनचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर ढवळपुरी परिसरात औद्योगिक वसाहत तसेच विजेचा प्रश्न मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न राहील असेही आ. लंके यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe