SBI कडून 53 लाखांचे होम लोन घेतल्यास किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार ? वाचा सविस्तर

तुम्हाला एसबीआयकडून होम लोन घ्यायचे आहे का? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज आपण एसबीआयकडून 53 लाखांचे होम लोन घेतल्यास कितीचा ईएमआय भरावा लागेल याच कॅल्क्युलेशन पाहणार आहोत.

Published on -

SBI Home Loan EMI : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना होम लोन सुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे. अलीकडे एसबीआयने होम लोनच्या व्याजदरात मोठ्या प्रमाणात कपात सुद्धा केली आहे.

खरे तर, आरबीआयने गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केली. यानंतर या चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सुद्धा रेपो रेटमध्ये 0.25 टक्के कपात करण्यात आली. याचाच परिणाम म्हणून देशभरातील बँकांकडून होम लोनच्या व्याजदरात कपात करण्यास सुरुवात झाली.

एसबीआयने देखील आरबीआयच्या निर्णयानंतर होम लोनच्या व्याजदरात कपात केली असून यामुळे एसबीआय कडून होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना आरबीआयच्या निर्णयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आता आपण एसबीआयच्या होम लोनची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे आहे एसबीआयचे होम लोन ?

बँकेकडून प्राप्त माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आपल्या ग्राहकांना किमान 8% व्याजदरात होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र बँकेचे हे सुरुवातीचे व्याजदर असून या व्याजदराचा फायदा फक्त आणि फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच मिळतो.

आधी एसबीआयचे सुरुवातीचे व्याजदर 8.50% इतके होते. मात्र आरबीआयने गेल्या काही महिन्यांत रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर एसबीआय कडून देखील व्याजदरात कपात करण्यात आली आहे. एसबीआयचे होम लोनचे व्याजदर 0.50 टक्क्यांनी कमी झाले आहेत.

एसबीआयकडून 53 लाखांचे गृह कर्ज घेतल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार ?

जर समजा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून किमान 8% व्याजदरात एखाद्या ग्राहकाला 53 लाख रुपयांचे गृह कर्ज वीस वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर संबंधित ग्राहकाला 44 हजार 331 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

म्हणजेच या वीस वर्षांच्या कालावधीत सदर ग्राहकाला 1 कोटी सहा लाख 39 हजार 440 रुपये बँकेकडे भरावे लागणार आहेत. म्हणजेच 53 लाख 39 हजार 440 रुपये व्याज स्वरूपात बँकेला द्यावे लागतील.

मात्र, ही गणना आठ टक्के व्याज दरानुसार करण्यात आलेली आहे. जर तुम्हाला यापेक्षा अधिकच्या व्याजदारात कर्ज मंजूर झाले तर तुम्हाला जास्तीचा हप्ता भरावा लागणार आहे आणि व्याजही अधिक लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News