लाच घेताना भूमिअभिलेख लिपिकास अटक

Ahmednagarlive24
Published:

श्रीरामपूर: येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपिक बाबुराव यादवराव राशीनकर याला दहा हजारांची लाच घेताना नाशिक व नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने शनिवारी रंगेहाथ पकडले.

टाकळीभान येथील एका शेतकऱ्याची नेवासे-श्रीरामपूर रस्त्यावर भोकर शिवारात ३० आर जमीन आहे. या जागेची मोजणी करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने मोजणीची तारीख मिळण्यासाठी अर्ज केला होता.त्यासाठी राशीनकरने २० हजार रोख व मोजणी शुल्क २५०० रुपये अशी एकूण २२५०० रुपयांची मागणी केली.

तडजोड करून १० हजार रुपयांवर ठरले. संबंधित शेतकऱ्याने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्याशी संपर्क करून याबाबत तक्रार केली. त्यानुसार नगर व नाशिक विभागाचे सुमारे ८ अधिकारी व २ पंच अशा १० जणांच्या पथकाने पहाटेच श्रीरामपूर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय परिसराची पाहणी करून सापळा लावला.

संबंधित शेतकरी दुपारी १२ च्या सुमारास भूमी अभिलेख कार्यालयात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक श्याम पवरे, सहायक पोलिस निरीक्षक दीपक करंडे, पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर, नीलेश सोनवणे यांनी राशीनकर याला १० हजार रुपये रोख घेताना रंगेहाथ पकडले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment