अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- यंदाच्या वर्षी देशासह राज्यात कोरोनाने गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला होता. यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली.
आर्थिक उलाढाल ठप्प झाली. त्यातच अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे.
त्यामुळे बळीराजा चिंतेत पडलेला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे अशी मागणी पंचायत समितीच्या सभापती अश्विनी कानगुडे यांनी केली आहे.
सभापती कानगुडे यांनी आ. रोहित पवार यांना निवेदन देऊन त्यांनी ही मागणी केली आहे. तसेच त्यांनी उया निवेदनात म्हटले आहे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सर्व आर्थिक गणित कोलमडले आहे.
शुल्कविना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे. अनेक पालकांनी पाल्याच्या शिक्षणासाठी बँकेतून कर्ज घेतलेले आहे.
त्यामुळे ते भरणार कसे याची चिंता विद्यार्थी व पालक वर्गाला पडली आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून विद्यार्थ्यांचे या वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करावे अशी मागणी सभापती कानगुडे यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved