DMart salary : मित्रांनो DMart मध्ये ग्राहकांना दररोज स्वस्त दरात आवश्यक वस्तू उपलब्ध करून देते. या मोठ्या यंत्रणेला चालवण्यासाठी हजारो कर्मचारी मेहनत करत असतात. मग अशा ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेमका किती पगार मिळतो? हे जाणून घेणे अनेकांना उत्सुकतेचे वाटते.

DMart ची स्थापना 2002 मध्ये प्रसिद्ध उद्योजक राधाकृष्ण दमाणी यांनी मुंबईत केली. अल्पावधीतच ही साखळी देशभरात 330 पेक्षा अधिक स्टोअर्सपर्यंत पोहोचली आहे. ग्राहकांमध्ये असलेल्या विश्वासामुळेच DMart आज प्रत्येक घरात ओळखले जाते. या यशामागे ग्राहक सेवा आणि शिस्तबद्ध कर्मचारी व्यवस्थापन हा एक मोठा आधार आहे.
DMart मधील कर्मचाऱ्यांचा पगार
सेल्स असोसिएट / कॅशियर: या पदावर काम करणाऱ्यांना दरमहा ₹12,000 ते ₹14,000 इतका पगार मिळतो. ग्राहक सेवा, बिलिंग आणि माल ठेवण्याचं काम हे त्यांचं मुख्य कार्य असतं.
स्टोअर स्टाफ / रिटेल असिस्टंट: या पदासाठी ₹10,800 ते ₹14,200 इतका मासिक पगार दिला जातो. शेल्फ लावणे, माल भरवणे आणि ग्राहकांना मदत करणे हे त्यांचे काम असते.
सुपरवायझर / सेक्शन हेड: यांचा पगार ₹18,000 ते ₹25,000 दरम्यान असतो. हे कर्मचारी विभाग व्यवस्थापन, स्टाफ कोऑर्डिनेशन आणि कामाचे नियोजन करतात.
असिस्टंट स्टोअर मॅनेजर / डेप्युटी मॅनेजर: या पदावर ₹30,000 ते ₹52,000 पर्यंत पगार दिला जातो. शिफ्ट मॅनेजमेंट, टीमचे कामकाज आणि स्टोअर मॅनेजरला सहाय्य करणे हे त्यांचे मुख्य कार्य असते.
स्टोअर मॅनेजर: या वरिष्ठ पदावर काम करणाऱ्यांना ₹40,000 ते ₹90,000 मासिक पगार मिळतो. संपूर्ण स्टोअरचे व्यवस्थापन, विक्री देखरेख आणि कर्मचारी नियंत्रण हे जबाबदारीचे काम ते पाहतात.
ऑफिस पदे
Legal Officer यांना ₹3.3 लाख वार्षिक पॅकेज असते. तर Legal Manager यांना ₹11 लाख वार्षिक पॅकेज, IT Assistant/Admin यांना ₹18,000 ते ₹25,000 मासिक वेतन,
Real Estate Manager यांना ₹14 ते ₹15 लाख वार्षिक पॅकेज असते. तसेच Structural Designer पदासाठी ₹70,000 पेक्षा अधिक मासिक वेतन असते.
जॉबसह मिळतात असे फायदे
DMart आपल्या कर्मचाऱ्यांना EPF, ग्रॅच्युटी, वैद्यकीय विमा, परफॉर्मन्स बोनस, आणि स्टाफ डिस्काउंटसारखे फायदे देखील देते. सुरुवातीला पगार तुलनेने कमी असला तरी अनुभव वाढल्यानंतर वेतन आणि जबाबदाऱ्या दोन्ही वाढतात.
DMart मध्ये मेहनतीने आणि शिस्तीने काम करणाऱ्यांना चांगले करिअर घडवण्याची संधी मिळते. म्हणूनच अनेक तरुण आज DMart मध्ये स्थिर आणि सुरक्षित नोकरीच्या शोधात असतात.