कमी पैशांत आरामदायी जीवन जगायचं असेल तर हे 10 देश बघा

फक्त स्वप्नं बघू नका ! व्हिएतनाम, फिलीपिन्स, बालीपासून पनामा, कोलंबियासारखे देश कमी पैशातही उच्च दर्जाचं जीवन देतात. इथे राहणीमान परवडतं, निसर्ग जवळ असतो आणि आयुष्य खरंच 'स्लो, सस्टेनेबल आणि सुंदर' वाटतं. स्वस्तात जगायचं असल्यास ही यादी नक्की बघा!

Published on -

Cheapest Countries जर तुमचं स्वप्न आहे की कमी खर्चात उच्च दर्जाचं जीवन जगायचं, तर हे देश त्या स्वप्नाला वास्तवात उतरवू शकतात. तुम्हाला गरज आहे फक्त थोड्या धाडसाची, मनातल्या मर्यादा मोडण्याची आणि मग जग तुमचं नवीन घर बनायला तयार आहे.

आजच्या धावपळीतल्या जगात प्रत्येकालाच वाटतं की आपल्या मेहनतीच्या पैशात आरामदायी, शांत आणि आनंददायी जीवन जगता यावं. पण ते शक्य आहे का? अर्थातच आहे जगात काही देश असे आहेत जिथं राहणीमान फक्त किफायतशीरच नाही, तर तिथलं वातावरण, संस्कृती, आणि निसर्गही मनाला भिडणारं आहे. जर तुम्हाला स्वप्नातल्या आयुष्याची चव अनुभवायची असेल – पण बजेटचाही विचार करायचा असेल – तर हे काही देश तुमच्यासाठी खरोखरच खास ठरू शकतात.

सर्वात आधी नाव घेतलं जातं ते व्हिएतनामचं. सलग चौथ्या वर्षी ‘इंटरनेशन्स एक्सपॅट इनसाइडर’च्या सर्वेक्षणात जगातील सर्वात स्वस्त देश म्हणून त्याने बाजी मारली आहे. राजधानी हनोई किंवा हो ची मिन्हसारख्या शहरांपासून थोडं दूर गेलं की तुम्हाला इथलं वास्तव किती शांत, सुरळीत आणि बजेटमध्ये बसणारं आहे हे लक्षात येईल. स्थानिक स्ट्रीट फूडचा स्वाद आणि स्वस्त भाड्याची घरं, हे या देशाचं खास आकर्षण. दरमहा फक्त $500-700 मध्ये एखादं मोकळं आयुष्य इथे सहज जगता येतं.

दक्षिण अमेरिकेत वसलेलं कोलंबिया हे अजून एक आकर्षक ठिकाण. मेडेलिन आणि बोगोटासारख्या शहरांमध्ये भाड्याच्या घरांची किंमत तुलनेत खूपच कमी आहे. शिवाय येथील रंगीबेरंगी संस्कृती आणि लोकांची आपुलकी यामुळे निवृत्त झालेल्या व्यक्तींसाठी हा देश स्वर्गासारखा वाटतो.

बाली म्हटलं की सुंदर समुद्रकिनारे, थंडीविरहित हवामान आणि पर्यटनधर्मी संस्कृती डोळ्यासमोर येते. इंडोनेशियामधल्या या ठिकाणी राहणं इतकं स्वस्त आहे की अनेक परदेशी नागरिक इथे कायमचे राहायला आले आहेत. स्थानिक अन्न आणि सार्वजनिक वाहतूक वापरल्यास खर्च आणखीनच कमी होतो. निसर्गाच्या सान्निध्यातलं हे जीवन अनुभवण्यासारखं आहे.

पनामा हा देश स्वस्त आहे. येथील आरोग्यसेवा ही केवळ सुलभच नाही तर दर्जेदारही आहे. कर कमी आणि मालमत्तेचे दर वाजवी असल्यामुळे निवृत्त व्यक्तींसाठी पनामा हे एक शांततामय निवासस्थान ठरत आहे.

फिलीपिन्समध्ये इंग्रजी भाषेचा प्रचंड वापर असल्यामुळे तिथे स्थलांतर करणं सोपं जातं. किनाऱ्यावरचं जीवन आणि शांत वातावरण हे इथलं वैशिष्ट्य. दरमहा $700-900 मध्ये इथे आरामात राहता येतं आणि तेही फारशा तडजोडी न करता.

मेक्सिकोमध्ये निवास करणं केवळ स्वस्तच नाही, तर तिथली समुद्रकिनारी ठिकाणं आणि स्थानिक जीवनशैली देखील खूप आकर्षक आहे. आरोग्यसेवा चांगली असून परदेशी नागरिकांचा एक मोठा समुदायही इथे सापडतो, ज्यामुळे नवीन लोकांनाही इथे आपलंसं वाटतं.

थायलंडचा विचार करताना बँकॉक, चियांग माई किंवा फुकेतसारखी ठिकाणं डोळ्यांसमोर येतात. येथे रस्त्यावरचं अन्न केवळ स्वस्त नाही, तर चविष्टही आहे. आरोग्यसेवा चांगली असून, पर्यटकांसाठी हा देश केव्हाही हक्काचं ठिकाण असतो.

ब्राझीलमध्ये रिओ डी जानेरो किंवा साओ पाउलोच्या बाहेर राहिल्यास खर्च खूपच कमी होतो. यासोबतच तिथलं निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे आणि रंगीबेरंगी संस्कृती आयुष्य अधिक आनंददायी बनवते.

शेवटी, चीन. इथल्या मोठ्या शहरांमधून थोडं बाजूला गेलं की राहणीमान खूपच परवडणारं आहे. शिक्षण, आरोग्यसेवा आणि सार्वजनिक वाहतूक या सगळ्या गोष्टी चांगल्या दर्जाच्या असूनही अतिशय वाजवी दरात मिळतात. त्यामुळे चीन हा देखील बजेटमध्ये राहण्यासाठी योग्य पर्याय ठरतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe