MBBS चं नाही तर NEET UG नंतर ‘या’ अभ्यासक्रमांना सुद्धा ऍडमिशन घेता येते !

यावर्षी देशभरातील 23 लाख विद्यार्थ्यांनी नीट युजी परीक्षा दिली आहे आणि हे सारे विद्यार्थी आता निकालाची वाट पाहत आहेत. खरे तर नीट युजी परीक्षा दिल्यानंतर बहुतांश विद्यार्थी एमबीबीएसला ऍडमिशन घेण्याच्या तयारीत असतात. पण आज आपण नीट दिल्यानंतर एमबीबीएस व्यतिरिक्त आणखी कोणते 3 कोर्सेस केले जाऊ शकतात याबाबत माहिती पाहणार आहोत. 

Published on -

Best Medical Course : बारावी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी मेडिकल आणि इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेतात. दरम्यान जर तुमचाही बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मेडिकल फिल्म मध्ये करिअर करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे.

आज आपण बारावी विज्ञान उत्तीर्ण झाल्यानंतर मेडिकल फील्डमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. खरे तर वैद्यकीय क्षेत्राचा विषय निघाला की सर्वप्रथम ओठांवर एमबीबीएस चे नाव येते.

पण वैद्यकीय क्षेत्रात फक्त एमबीबीएस हा एक मात्र अभ्यासक्रम नाही. नक्कीच एमबीबीएसचे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे यात शंकाच नाही. परंतु एमबीबीएस च्या जागा फारच मर्यादित आहेत.

यामुळे नीट युजी परीक्षा ज्यांनी दिली असेल आणि जे एमबीबीएस साठी आवश्यक असणाऱ्या कटऑफ पर्यंत पोहोचू शकत नसतील त्यांच्यासाठी आज आम्ही वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस व्यतिरिक्त आणखी कोणते महत्त्वाचे अभ्यासक्रम आहेत याची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण नीट युजी दिल्यानंतर विद्यार्थी कोणकोणत्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतात याची डिटेल माहिती पाहणार आहोत.

हे आहेत वैद्यकीय क्षेत्रातील काही प्रमुख अभ्यासक्रम

फार्मसी : बी फार्मा हा एक लोकप्रिय अभ्यासक्रम आहे. देशात बी फार्मा ला ऍडमिशन घेणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. तज्ञ सांगतात की अभ्यासक्रमात औषध निर्मिती, क्लिनिकल संशोधन आणि नियामक बाबी शिकवल्या जातात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजची नोकरी लागू शकते.

हा एक चार वर्षांचा अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी नीट युजी, काही राज्य शासनाच्या प्रवेश परीक्षा देणे आवश्यक आहे. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि फिजिक्स केमिस्ट्री मॅथ या विषयासह बारावी उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी प्रवेश घेऊ शकतात. परंतु या विषयांचा विद्यार्थी 50% गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

BDS : हा सुद्धा एक लोकप्रिय अभ्यासक्रम आहे. हा एक पाच वर्षांचा अभ्यासक्रम असून अनेक विद्यार्थी यामध्ये ऍडमिशन घेतात. या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमात एका वर्षाच्या इंटर्नशिप चा सुद्धा समावेश होतो. फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी सह 50 टक्के गुणांनी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी नीट युजी ही एन्ट्रान्स एक्झाम द्यावी लागते.

बीएएमएस : हा सुद्धा एक लोकप्रिय अभ्यासक्रम आहे. यात आयुर्वेदिक औषध, औषधी वनस्पती आणि आधुनिक शरीरशास्त्र शिकवले जाते. हा कोर्स साडेपाच वर्षांचा आहे. फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयासह 50 टक्के गुणांनी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी पात्र ठरतात. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवायचा असेल तर नीट युजी परीक्षेत चांगले गुण असणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News