Top Engineering Colleges : गेल्या महिन्यात बारावी बोर्डाचा निकाल लागला. आधी सीबीएसई बोर्डाचा आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गाचे निकाल जाहीर झालेले आहेत. महत्वाची बाब म्हणजे विद्यार्थी पुढील वर्गाच्या प्रवेशासाठी सुद्धा लगबग करतांना दिसत आहेत.
बारावी सायन्स उत्तीर्ण झालेले बहुतांशी विद्यार्थी मेडिकल किंवा मग इंजीनियरिंगला ऍडमिशन घेण्याची तारीख आहे. मेडिकलला आणि इंजीनियरिंगला एडमिशन घेणाऱ्यांची संख्या आपल्या देशात फारच अधिक आहे.

दरम्यान जर तुम्हालाही बारावी सायन्स नंतर इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्यायचे असेल आणि तुम्ही देशातील टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसबाबत शोधाशोध करत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. कारण की आज आपण देशातील टॉप 7 प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती जाणून घेणार आहोत.
ह्या आहेत देशातील टॉप 7 प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज
अॅमिटी युनिव्हर्सिटी : अॅमिटी युनिव्हर्सिटी ही सुद्धा देशातील एक प्रमुख प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आणि बेस्ट प्रायव्हेट इंजीनियरिंग कॉलेज म्हणून ओळखली जाते. या कॉलेजमधून बी टेक केलास तुम्हाला नक्कीच चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.
इथून बी टेक करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल 12 लाख रुपयांपर्यंतच्या ऑफर्स आलेल्या आहेत. या कॉलेजमधून कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग मधून बी.टेक करण्यासाठी अंदाजे 16 लाख 72 हजार रुपये एवढे शुल्क भरावे लागते.
व्हीआयटी वेल्लोर : व्हीआयटी वेल्लोर येथे बी.टेक ईन सीएसई म्हणजेच कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग या अभ्यासक्रमासाठी सात लाख 80 हजार रुपये एवढी फी भरावी लागते. पण या कॉलेजची फी जेवढी अधिक आहे तेवढाच या कॉलेजचा प्लेसमेंट रेकॉर्ड सुद्धा फारच छान आहे.
इथून कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग मधून बीटेक पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सरासरी सात ते आठ लाख रुपये पॅकेजची नोकरी सहज मिळू शकते असा दावा केला जातो. एवढेच नाही तर या कॉलेजमध्ये येणाऱ्या कंपन्या काही विद्यार्थ्यांना 50 लाख रुपये पर्यंतच्या पॅकेजच्या नोकऱ्या सुद्धा देतात.
थापर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी : थापर विद्यापीठ, बी.टेक सीएसई म्हणजेच कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग अभ्यासक्रमासाठी देशात सर्व दूर प्रसिद्ध आहे. या कॉलेजमधून जर हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला 20 लाख 92 हजार रुपये एवढे शुल्क भरावे लागणार आहे. या कॉलेजचा प्लेसमेंट रेकॉर्ड मात्र फारच शानदार आहे. इथून डिग्री प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना कमाल वीस लाख रुपयांपर्यंतच्या नोकरीच्या ऑफर्स मिळतात. एसआरएम
युनिव्हर्सिटी चेन्नई : एसआरएम युनिव्हर्सिटी सुद्धा देशातील एक प्रमुख प्रायव्हेट यूनिवर्सिटी आहे. हे एक बेस्ट प्रायव्हेट इंजीनियरिंग कॉलेज म्हणून ओळखले जाते. इथे बी.टेक सीएसईसाठी 18 लाख रुपये एवढे शुल्क भरावे लागणार आहे. या कॉलेजमधून डिग्री प्राप्त झाल्यानंतर कमाल 20 लाख रुपयांपर्यंतच्या पॅकेजची नोकरी मिळू शकते.
शिक्षा ‘ओ’ अनुसंधान : शिक्षा ‘ओ’ अनुसंधान विद्यापीठात, बी.टेक सीएसईसाठी प्रति सेमिस्टर शुल्क अंदाजे एक लाख 38 हजार रुपये एवढे आहे. या कॉलेजच्या प्लेसमेंट आकडेवारीबाबत बोलायचं झालं तर येथील विद्यार्थ्यांना सरासरी चार ते सहा लाख रुपयांपर्यंतच्या नोकरीची ऑफर मिळते. कमाल दहा ते बारा लाख रुपये पॅकेजच्या नोकऱ्या सुद्धा विद्यार्थ्यांना मिळतात.
बीआयटीएस पिलानी : हे सुद्धा देशातील एक प्रमुख प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी ओळखले जाणारे, बीआयटीएस पिलानी हे कॉलेज इंजीनियरिंग साठी नक्कीच बेस्ट ठरणार आहे. या कॉलेजच्या फीबाबत बोलायचं झालं तर येथून बी.टेक सीएसई अभ्यासक्रम पूर्ण करायचा झाल्यास विद्यार्थ्यांना 23 लाख 81 हजार रुपयांपर्यंतचे शुल्क भरावे लागते.
पण या विद्यापीठाचा प्लेसमेंट रेकॉर्ड प्रभावी आहे. येथून डिग्री प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी 20 ते 25 लाख रुपये वार्षिक पॅकेज ची नोकरी लागते. काही विद्यार्थ्यांना तर चाळीस लाख रुपयांपेक्षा जास्त पॅकेज मिळत आहे.
अमृता विश्व विद्यापीठ : अमृता विश्व विद्यापीठ हे देखील देशातील एक प्रमुख प्रायव्हेट विद्यापीठ आहे. इंजीनियरिंग साठी हे विद्यापीठ सर्वोत्कृष्ट आहे. इथून जर तुम्हाला बी.टेक सीएसई हा कोर्स करायचा असेल तर तुम्हाला साधारणतः 18 लाख रुपये एवढे शुल्क भरावे लागणार आहे.
परंतु यातून डिग्री प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना सरासरी पाच ते सहा लाख रुपये वार्षिक पॅकेजची नोकरी लागते. काही विद्यार्थ्यांना तर 15 लाख रुपये वार्षिक पॅकेजची नोकरी लागलेली आहे.