महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! 13 जून 2025 पासून सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील ‘या’ सहा रेल्वे स्टेशनवर थांबणार

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी आज पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून आज आपण या नव्या एक्सप्रेस ट्रेनची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 

Published on -

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी खुशखबर आहे. ही बातमी महाराष्ट्रातून पंजाबला आणि पंजाबहुन महाराष्ट्राकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण ती रेल्वेकडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे.

ही ट्रेन आज 13 जून 2025 पासून सुरु होणार आहे. पंजाबमधील फिरोजपूर आणि महाराष्ट्रातील हजूर साहिब नांदेड या दोन धार्मिक स्थळांदरम्यान ही ट्रेन चालवली जाणार असून ही एक साप्ताहिक ट्रेन राहणार आहे.

अशा परिस्थितीत आज आपण या साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक, तसेच ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेते या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. 

कस आहे वेळापत्रक ? 

पंजाबमधील फिरोजपूर आणि महाराष्ट्रातील हजूर साहिब नांदेड या तीर्थक्षेत्रांना जोडणारी नवीन साप्ताहिक एक्स्प्रेस रेल्वे सेवा शुक्रवार, 13 जून 2025 पासून सुरू होत आहे. या ट्रेनमुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील अनेक महत्त्वाच्या धार्मिक केंद्रांना रेल्वेची कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास तज्ञांकडून व्यक्त केला जातोय.

या नव्या रेल्वेसेवेच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ही ट्रेन दर शुक्रवारी फिरोजपूरहून प्रस्थान करणार आहे आणि दर रविवारी नांदेडहून परतीचा प्रवास सुरु करणार आहे.

ही गाडी 15 जून 2025 रोजी दुपारी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी नांदेड रेल्वे स्थानकावरून रवाना होणार आहे. हा प्रवास या रेल्वे सेवेचा पहिला प्रवास राहणार आहे. ही गाडी सुमारे दोन हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करेल आणि हा प्रवास अवघ्या 38 तासांमध्ये पूर्ण होणार आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की ही गाडी पंजाब येथील फिरोजपुर येथून शुक्रवारी दुपारी एक वाजून 25 मिनिटांनी रवाना होणार आहे आणि हुजूर साहेब नांदेड येथे पहाटे तीन वाजून 30 मिनिटांनी पोहोचणार आहे. आता आपण या गाडीला कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला याची माहिती जाणून घेणार आहोत.

या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार नवीन एक्सप्रेस 

या नव्या रेल्वेसेवेमुळे महाराष्ट्र व पंजाबमधील परस्पर संपर्क वाढून आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती मिळणार आहे. विशेषतः सीमावर्ती भागातील जवानांसाठी ही ट्रेन मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.

रेल्वे मंत्रालयाचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या गाडीला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. फरिदकोट, भटिंडा जंक्शन, जाखल जंक्शन, जींद जंक्शन, रोहतक, दिल्ली सफदरजंग, फरिदाबाद, पलवल, मथुरा जंक्शन,

आग्रा कैन्ट, ग्वाल्हेर जंक्शन, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना जंक्शन, विदिशा, भोपाळ, इटारसी जंक्शन, खंडवा जंक्शन, मनमाड जंक्शन, छत्रपती संभाजीनगर, जालना, सेलू, परभणी, पूर्णा अशा महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबा घेणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News