जुलै महिन्यात मुंबईहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन !

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय रेल्वे वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर या गाडीचा शयनयान प्रकार सुद्धा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान जुलै महिन्यात महाराष्ट्राला एका नव्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळणार असल्याची बातमी आता समोर येत आहे. 

Published on -

Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता भारतीय रेल्वे वंदे भारत स्लीपर ट्रेन लाँच करणार आहे. खरंतर वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून जोरदार प्रतिसाद मिळतोय. ही गाडी चेअर कार प्रकारातील आहे. सध्या ही गाडी देशातील अनेक राज्यात सुरू आहे.

महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यातील अकरा महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते शिर्डी, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

महत्त्वाचे म्हणजे या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना महाराष्ट्रातील प्रवाशांकडून जोरदार प्रतिसाद सुद्धा मिळतोय. अशातच आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे की बातमी मुंबईकरांसाठी अधिक खास ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा बहुमान आपल्या मुंबईला मिळेल. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईवरून पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. 

30 नव्या वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार 

मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर चालू आर्थिक वर्षात सरकारने 30 वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याचे टार्गेट ठेवले आहे. महत्वाची बाब अशी की, पहिली ट्रेन पुढील महिन्याच्या अखेरीस म्हणजेच जुलैपर्यंत रुळांवर धावताना दिसेल असे बोलले जात आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची स्पीड ट्रायल पूर्ण झाली आहे. सध्या रेल्वे बोर्ड पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मार्ग आणि भाडे ठरवत आहे. यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, पुढील महिन्यात पंतप्रधान मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

रेल्वेच्या मते, 2025-26 या चालू आर्थिक वर्षात एकूण 30 वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवल्या जाऊ शकतात. नक्कीच एवढ्या मोठ्या प्रमाणात वंदे भारत स्लीपर ट्रेनचे संचालन सुरू झाले तर याचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, बेंगळुरू येथील सरकारी मालकीच्या कंपनी बीईएमएल (भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड) ने 10 वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार केल्या आहेत. आता पहिली ट्रेन चालवण्याची परवानगी मिळाल्यानंतर, उर्वरित ट्रेन देखील हळूहळू रुळांवर आणल्या जाणार आहेत. 

मुंबईला मिळणार मोठी भेट 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) मध्ये 8 ते 10 वंदे भारत गाड्या तयार केल्या जात आहेत. या गाड्यांचे कोच BEML आणि ICF द्वारे संयुक्तपणे तयार केले जात आहेत.

दरम्यान या आर्थिक वर्षात देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत स्लीपर ट्रेनचे संचालन सुरु होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे राजधानी मुंबईला सुद्धा वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळणार आहे.

मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते हावडा या महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. तथापि वंदे भारत स्लीपर ट्रेन चे अधिकृत रूट अजून निश्चित झालेले नाहीत यामुळे ही गाडी कोणकोणत्या मार्गांवर धावणार ही गोष्ट खरंच पाहण्यासारखी राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!