‘या’ जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणी झाल्या दोडक्या ; एकाच टप्प्यात 14 हजाराहून अधिक लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढलं !

लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून हजारो महिलांना वगळण्यात आले आहे. एकाच जिल्ह्यातील जवळपास 14 हजाराहून अधिक महिलांना या योजनेतून वगळण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची घोषणा जून 2024 मध्ये झाली होती आणि या योजनेअंतर्गत प्रत्यक्षात जुलै 2024 पासून लाभ दिला जात आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.

आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना एकूण 11 हप्ते मिळाले आहेत. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 2025 या कालावधी मधील एकूण 11 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

महत्वाची बाब अशी की 15 ते 20 जून 2025 दरम्यान या योजनेचा बारावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याची खात्रीलायक बातमी सुद्धा मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. त्यामुळे महिला वर्ग मोठ्या उत्साहात आहे.

परंतु बारावा हफ्ता जमा होण्याआधीच या योजनेच्या संदर्भात एक नवीन आणि अगदीच धक्कादायक बातमी हाती आली आहे. ती म्हणजे या योजनेतून एकाच टप्प्यात जवळपास 14 हजाराहून अधिक महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे. 

या जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणी झाल्यात दोडक्या 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अनेक महिला अपात्र असताना सुद्धा लाभ घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खरेतर, ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी असूनही अनेक सक्षम महिलांनीही लाभ घेतल्याचे शासनाच्या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे आता अशा अपात्र महिलांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या अशा अपात्र महिला योजनेतून बाहेर काढल्या जात आहेत. सातारा जिल्ह्यात सुद्धा असंख्य अपात्र महिलांनी याचा लाभ घेतलाय. यामुळे आता या महिलांना योजनेतून बाहेर काढले जात आहे.

झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 14,868 लाभार्थी महिलांच्या नावावर किंवा त्यांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असल्याने त्या अपात्र ठरल्या आहेत. याशिवाय शासकीय नोकरदार व आयकर भरणाऱ्या महिलांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.

राज्यभरातील 2,000 शासकीय महिला कर्मचारी लाभार्थी असल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या सरकारी नोकरदार असणाऱ्या महिलांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आले आहे. शासनाने जानेवारीपासून विविध विभागांमार्फत माहिती गोळा करणे सुरू केले असून यामुळे अपात्र महिलांचे लाभ बंद करण्यात येत आहेत.

यामध्ये संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, शेतकरी सन्मान योजना, विधवा पेन्शन घेणाऱ्या महिलांचा सुद्धा समावेश आहे. दरम्यान, शासनाच्या रडारवर आलेल्या अपात्र लाभार्थ्यांची यादी लवकरच जिल्ह्यांना पाठवण्यात येणार आहे आणि मग या योजनेसाठी अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून हळूहळू वगळण्यात येणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!