अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापिठातील कर्मचाऱ्यांनी आज विद्यापिठाच्या मुख्य कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत वेतन आयोग लागू करावा अशी मागणी केली आहे.
याच प्रलंबित मागणी संदर्भात विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी याआधीही आंदोलन केले होते आज पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करत लक्षवेधी आंदोलन केले.
सातवा वेतन आयोग लागू करावा आणि 10 ते 20 वर्षानंतर अनुज्ञेय ठरणारी तीन लाभांच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना लागू करावी ही प्रमुख मागणी घेऊन राज्यातील चारही कृषी विद्यापिठात आज हे आंदोलन करण्यात येत आहे.
राज्यसरकारने मागणी मान्य न केल्यास राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी 02 नोव्हेंबर ते 05 नोव्हेंबर पर्यंत लेखणी बंद आंदोलन करतील.
तसेच 06 नोव्हेंबर रोजी एक दिवस सामुहिक रजा देवून आंदोलन करतील. 07 नोव्हेंबर पासून पुन्हा बेमुदत लेखणीबंद आंदोलन करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved