7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. सध्या राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत आणि याच महागाई भत्ता वाढीच्याबाबत आता एक नवीन माहिती हाती आली आहे. खरे तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यात सुधारित करण्यात आला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के करण्याचा मोठा निर्णय मार्च महिन्यात घेण्यात आला. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली आहे.

दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार? हा मोठा सवाल उपस्थित होतोय आणि याच बाबत आता एक नवीन माहिती समोर येत आहे.
कधी वाढणार महागाई भत्ता?
मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच जून अखेरपर्यंत राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा जीआर प्रत्यक्षात निर्गमित होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील दोन टक्क्यांनी वाढवला जाणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळत आहे.
मात्र आता हा महागाई भत्ता 55% होणार असून याबाबतचा निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत घेतला जाऊ शकतो. म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत याबाबतचा जीआर जारी होईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
तथापि याबाबतची अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही यामुळे खरंच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत याबाबतचा जीआर निघणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार
दरम्यान, राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 53 टक्क्यांवरून 55% होणार असून याबाबत शासन निर्णय जून महिन्याच्या शेवटी निघण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब अशी की ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहणार आहे.
यामुळे जानेवारी , फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या पाच महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. जून महिन्याच्या वेतनासोबतच महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार अशी शक्यता आहे.