आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर आर्मी जवानांचा पगार कितीने वाढणार ? शिपाई, नाईक, हवालदार, नायब सुभेदार, सुभेदार सर्वांचा संभाव्य पगार पहा…

आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज आपण आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर आर्मी जवानांचा पगार किती वाढणार याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. 

Published on -

8th Pay Commission : 16 जानेवारी 2025 हा तोच ऐतिहासिक दिवस ज्या दिवशी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. केंद्रातील सरकारकडून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळाल्यपासून या नव्या वेतन आयोगाच्या जोरदार चर्चा सुरू आहे.

खरे तर नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर याचा देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना फायदा होणार आहे. नव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा पगार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

दरम्यान आज आपण नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर आर्मी जवानांचा पगार कितीने वाढणार याबाबतची डिटेल माहिती आजच्या या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत.

आर्मी जवानांचा पगार कितीने वाढणार 

भारतीय लष्करातील कर्मचाऱ्यांना सुद्धा नव्या वेतन आयोगाची भेट मिळणार आहे. भारतीय लष्करातील जवानांना आठव्या वेतन आयोगात मोठ्या पगारवाढीची अपेक्षा आहे. केवळ नॉन-कमिशन्ड अधिकारी म्हणजे एनसीओ आणि ज्युनियर कमिशन्ड अधिकारी म्हणजे जेसीओच नाही तर कमिशन्ड अधिकारी देखील नवीन वेतन आयोगात मोठ्या पगारवाढीची अपेक्षा करत आहेत.

पण, 8व्या वेतन आयोगातील पगारवाढ फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर होण्याची शक्यता आहे, जो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी गुणक राहणार आहे. खरंतर सध्या मीडिया रिपोर्ट मध्ये अशा चर्चा सुरू आहेत की नव्या आठव्या वेतन आयोगात 2.28 इतका फिटमेंट फॅक्टर राहू शकतो.

अशा परिस्थितीत आता आपण जर फिटमेंट फॅक्टर 2.28 इतका राहीला तर भारतीय सैन्याच्या एनसीओएस, जेसीओ आणि कमिशन्ड अधिकाऱ्यांचा संभाव्य पगार काय असणार याचा आढावा घेणार आहोत. 

शिपाई : शिपाई पदावर कार्यरत आर्मी जवानांना सातव्या वेतन आयोग अंतर्गत 21,700 रुपये बेसिक पगार दिला जात असे मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात 2.28 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर हा बेसिक पगार 49 हजार 476 रुपयांवर जाणार आहे. 

नाईक : नाईक पदावर कार्यरत आर्मी जवानांना सातव्या वेतन आयोग अंतर्गत 25,500 रुपये बेसिक पगार दिला जात असे मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात 2.28 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर हा बेसिक पगार 58 हजार 140 रुपयांवर जाणार आहे. 

हवालदार : या पदावर कार्यरत आर्मी जवानांना सातव्या वेतन आयोग अंतर्गत 29,200 रुपये बेसिक पगार दिला जात असे मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात 2.28 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर हा बेसिक पगार 66 हजार 576 रुपयांवर जाणार आहे. 

नायब सुभेदार : या पदावर कार्यरत आर्मी जवानांना सातव्या वेतन आयोग अंतर्गत 35,400 रुपये बेसिक पगार दिला जात असे मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात 2.28 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर हा बेसिक पगार 80 हजार 712 रुपयांवर जाणार आहे. 

सुभेदार : या पदावर कार्यरत आर्मी जवानांना सातव्या वेतन आयोग अंतर्गत 44,900 रुपये बेसिक पगार दिला जात असे मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात 2.28 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर हा बेसिक पगार एक लाख 2 हजार 372 रुपयांवर जाणार आहे. 

सुभेदार मेजर : या पदावर कार्यरत आर्मी जवानांना सातव्या वेतन आयोग अंतर्गत 47,600 रुपये बेसिक पगार दिला जात असे मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात 2.28 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर हा बेसिक पगार एक लाख 8 हजार 528 रुपयांवर जाणार आहे. 

लेफ्टनंट : या पदावर कार्यरत आर्मी जवानांना सातव्या वेतन आयोग अंतर्गत 56,100 रुपये बेसिक पगार दिला जात असे मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात 2.28 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर हा बेसिक पगार एक लाख 27 हजार 908 रुपयांवर जाणार आहे.

कॅप्टन : या पदावर कार्यरत आर्मी जवानांना सातव्या वेतन आयोग अंतर्गत 61,300 रुपये बेसिक पगार दिला जात असे मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात 2.28 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर हा बेसिक पगार एक लाख 39 हजार 764 रुपयांवर जाणार आहे.

मेजर : या पदावर कार्यरत आर्मी जवानांना सातव्या वेतन आयोग अंतर्गत 69,400 रुपये बेसिक पगार दिला जात असे मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात 2.28 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर हा बेसिक पगार एक लाख 58 हजार 232 रुपयांवर जाणार आहे.

कर्नल : या पदावर कार्यरत आर्मी जवानांना सातव्या वेतन आयोग अंतर्गत एक लाख तीस हजार 600 रुपये बेसिक पगार दिला जात असे, मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात 2.28 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर हा बेसिक पगार 2 लाख 97 हजार 768 रुपयांवर जाणार आहे.

ब्रिगेडियर : या पदावर कार्यरत आर्मी जवानांना सातव्या वेतन आयोग अंतर्गत एक लाख 39 हजार 600 रुपये बेसिक पगार दिला जात असे, मात्र नव्या आठव्या वेतन आयोगात 2.28 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर हा बेसिक पगार 3 लाख 18 हजार 288 रुपयांवर जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!