एसबीआय की एचडीएफसी; कोणत्या बँकेचे होम लोन परवडणार ? 25 लाखांचे होम लोन घेतल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार ?

तुम्हालाही तुमच्या स्वप्नातील घरासाठी होम लोन घ्यायचे आहे का? मग आजची बातमी तुमच्या फायद्याची राहणार आहे. आज आपण देशातील दोन प्रमुख बँकांच्या होम लोनच्या व्याजदराची तुलना करणार आहोत.

Updated on -

Home Loan EMI : तुम्हीही होम लोन घेण्याच्या तयारीत आहात का मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. जर तुम्हाला या होम लोन घ्यायचे असेल आणि कोणत्या बँकेकडून होम लोन घ्यावे याबाबत तुम्ही कन्फ्युज असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी अधिक खास ठरेल.

कारण की आज आपण देशातील दोन प्रमुख बँकांच्या होम लोन च्या व्याजदराची तुलना करणार आहोत. एसबीआय आणि एचडीएफसी या दोन्ही बँकांच्या होम लोन बाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे तर एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक. यामुळे अनेकजन या बँकांकडून होम लोन घेण्यास उत्सुक असतात. दरम्यान आज आपण या दोन्ही बँकांच्या होम लोन ची तुलना करणार आहोत जेणेकरून ग्राहकांना कोणत्या बँकेचे होम लोन परवडू शकते याची कल्पना येऊ शकेल.

एचडीएफसी बँकेचे होम लोन

एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक म्हणून ओळखले जाते आणि आरबीआयने या प्रायव्हेट बँकेला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकेचा दर्जा सुद्धा दिलेला आहे. या बँकेची विशेषतः अशी की सध्या स्थितीला ही बँक आपल्या ग्राहकांना किमान 8.45% व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे.

मात्र हा बँकेचा सुरुवातीचा व्याजदर आहे आणि याचा फायदा फक्त आणि फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांनाच मिळतो. दरम्यान जर एचडीएफसी बँकेकडून 8.45% इंटरेस्ट रेट वर 25 लाख रुपयांचे होम लोन 20 वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर संबंधित ग्राहकाला 21,617 चा ईएमआय भरावा लागणार आहे.

एसबीआयचे होम लोन

एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक देखील आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. आरबीआयने या सरकारी बँकेला सुद्धा देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकेचा टॅग दिलेला आहे.

एसबीआय बाबत बोलायचं झालं तर ही बँक आपल्या ग्राहकांना किमान आठ टक्के व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे. जर समजा एखाद्या ग्राहकाने एसबीआयच्या किमान 8% व्याज दारात वीस वर्षांसाठी 25 लाख रुपयांचे गृह कर्ज घेतले तर अशा ग्राहकाला 20,911 रूपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. एकंदरीत एचडीएफसीच्या तुलनेत एसबीआयचे होम लोन परवडणारे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!