7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शेवटच्या डीए वाढीची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली असून आता पुन्हा एकदा संपूर्ण देशभर महागाई भत्ता वाढीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
खरे तर, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळत असते. पहिल्यांदा जानेवारी महिन्यापासून आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातो.

जानेवारी महिन्यापासून वाढवल्या जाणाऱ्या महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय हा साधारणतः मार्च महिन्यात निघतो आणि जुलै महिन्यापासून वाढवल्या जाणाऱ्या महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय हा दिवाळीच्या आसपास जाहीर केला जात असतो.
2025 बाबत बोलायचं झालं तर जानेवारी 2025 पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2% ने वाढवण्यात आला आहे. या वाढीमुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 55% इतका झाला असून आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार यासंदर्भात नवीन आकडेवारी हाती आली आहे.
काय सांगते नवीन आकडेवारी ?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जुलै 2025 पासून मिळणारी महागाई भत्ता वाढ ही सातव्या वेतन आयोगातील शेवटची महागाई भत्ता वाढ राहणार आहे. कारण म्हणजे प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत असतो.
सध्याचा सातवा वेतन आयोग एक जानेवारी 2016 पासून लागू झाला आहे म्हणून आठवा वेतन आयोग एक जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे आणि हेच कारण आहे की जुलै 2025 पासूनची महागाई भत्ता वाढ ही सध्याच्या वेतन आयोगाची शेवटची महागाई भत्ता वाढ राहणार आहे.
दरम्यान, ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्ता वाढ ठरवली जात असून जानेवारी ते जून 2025 या कालावधीमधील ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर जुलै 2025 ची महागाई भत्ता वाढ ठरणार आहे. ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाची जानेवारी ते एप्रिल या कालावधीमधील आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
या आकडेवारीनुसार यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% इतका आहे दरम्यान ही वाढ लागू झाल्यानंतर महागाई भत्ता 58% वर जाणार आहे.