Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात बुध ग्रहाला विशेष महत्त्व देण्यात आली आहे. बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखले जाते आणि म्हणूनच बुध ग्रहाचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन अधिक खास बनते. दरम्यान नुकतेच बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन झाले असून या नक्षत्र परिवर्तनाचा राशीचक्रातील काही राशीच्या लोकांवर मोठा सकारात्मक प्रभाव पाहायला मिळणार आहे.
हा ग्रह वाणी व्यापार आणि बुद्धीचा कारक ग्रह असतो आणि यामुळे या ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा राशीचक्रातील विविध राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक चेंजेस पाहायला मिळणार आहेत. दरम्यान आता आपण बुध ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा राशीचक्रातील कोणकोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार याचा आढावा घेणार आहोत.

बुध ग्रहाने कोणत्या नक्षत्रात प्रवेश केला ?
मिळालेल्या माहितीनुसार बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन झाले आहे. काल 16 जून 2025 रोजी बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन झाले. बुध ग्रह आता पुनर्वसू नक्षत्रात आहेत. बुध ग्रहाच्या पुनर्वसु नक्षत्रातील गोचर मुळे राशीचक्रातील काही महत्त्वाच्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. आज 17 जून पासून काही राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे.
या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
कुंभ : या राशीच्या जातकांना आज पासून विशेष लाभ मिळणार आहे. या पुढील काळ सर्वांगीण यशाचा ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल राहणार आहे, शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा उत्तम यश मिळणार असे म्हटले जात आहे. करिअरवाईस सुद्धा हा काळ महत्त्वाचा राहील.
नोकरीत कार्यक्षमता दाखवणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक आणि प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे या लोकांचा कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि ते आणखी चांगली कामगिरी करतील. महत्त्वाची बाब म्हणजे या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता असून, सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा वाढणार आहे.
सिंह : कुंभ राशीप्रमाणेच सिंह राशीच्या लोकांचाही वाईट काळ आता समाप्त होणार आहे. आज 17 जून पासून या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत.
बुध ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांची अनेक दिवसांपासूनची प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग सुद्धा मोकळे होतील आणि याचाच परिणाम म्हणून या राशीच्या लोकांची पैशांची कटकट दूर होणार आहे.
यांच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होईल. कौटुंबिक संबंध बळकट होतील आणि प्रेमसंबंध अधिक सुखकर बनतील अशी माहिती ज्योतिष तज्ञांनी दिली आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा काळ अनुकूल राहणार आहे. कारण नोकरीत सकारात्मक बदल दिसून येणार असे संकेत मिळत आहेत.
मेष : बुध ग्रह हा वाणी व्यापार आणि बुद्धीचा कारक ग्रह आहे. दरम्यान आता याच ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन झाले असल्याने मेष राशीच्या लोकांना भौतिक सुखाची प्राप्ती होणार आहे. ज्योतिष तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या राशीच्या लोकांचा समाजातील मान सन्मान वाढणार आहे. कुटुंबात देखील अगदीच आनंदाचे वातावरण राहणार आहे.
या लोकांना आपल्या जिवाभावाच्या मित्रांसमोर चांगला वेळ घालवता येणार आहे. पिकनिकचे तसेच दूरवरच्या प्रवासाचे योग सुद्धा तयार होत आहेत. या लोकांना अनेक नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ फारच अनुकूल राहणार आहे. विद्यार्थ्यांना या काळात चांगली यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच नोकरीपेशा व्यक्तींसाठी सुद्धा हा काळ फायद्याचा राहील. नोकरीमध्ये सकारात्मक बदल या लोकांना अनुभवायला मिळणार आहेत.