अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा दर सात दिवसांत आणखी दोन टक्क्यांनी कमी झाला. मंगळवारी हा दर ९६.०४ होता. सात दिवसांपूर्वी दर ९४ टक्के होता. खासगी हॉस्पिटल्स, तसेच विविध संस्थांची कोविड सेंटर रिकामी झाली आहेत.
दरम्यान, कोरोनाने आणखी पाच जणांचा बळी घेतला असून, २२१ नवे रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात आतापर्यंत ८४८ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ५५ हजार ३५० रुग्ण आढळून आले आहेत.
मंगळवारी २९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ९४५ झाली आहे. मंगळवारी रुग्णसंख्येत २२१ ने वाढ झाली.
उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १५५७ झाली. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३६, खासगी प्रयोगशाळेत २४ आणि अँटीजेन चाचणीत १६१ बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयात मनपा ११, कर्जत २, नगर ग्रामीण ४, पारनेर ४, पाथर्डी ११ श्रीगोंदे ४ रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत मनपा १२, जामखेड २, नगर ग्रामीण ५, राहाता १, राहुरी १, संगमनेर २, श्रीरामपूर १ रुग्ण आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved