अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- काँग्रेसचा पक्ष वाढवणे हे आपले सर्वांचेच महत्वपूर्ण ध्येय आहे. परंतु आपल्याला पक्ष वाढ केवळ निवडणुका जिंकण्यासाठी करायची नसून
जनहितासाठी व जनतेला भाजपसारख्या जातीयवादी पक्षांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी करायची आहे असे आवाहन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
पारनेर तालुका काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक भाळवणी येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव रोहोकले यांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अध्यक्षीय भाषणात आ. डॉ. सुधीर तांबे यांनी संभाजी रोहोकले यांच्या पक्ष वाढीच्या प्रयत्नांची स्तुती करत संगमनेरच्या सर्व सहकार्याची ग्वाही दिली.
यावेळी तांबे यांनी केंद्र सरकारच्या सर्व धोरणांवर आणि कायद्यांवर त्यांनी अत्यंत मुद्देसूद अशी टीका करून त्यातले संभाव्य धोके समजावून सांगितले. या संभाव्य धोक्यांबद्दल जनतेला जागृत करण्याचे आवाहन त्यांनी नवनिर्वाचित काँग्रेस कार्यकारिणी सदस्यांना केली.
आ. डॉ. तांबे यांनी येणार्या पारनेर नगरपंचायत आणि 88 ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भात प्रमुख पदाधिकार्यांशी चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नगरपंचायत निवडणुकीमध्ये आम्हाला ताकद द्यावी. या संभाजी रोहोकले यांच्या विनंतीवरून उत्तर देताना डॉ. तांबे यांनी सर्व प्रकारच्या सहकार्याची ग्वाही दिली.
जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी यावेळी तालुका काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर केली. याप्रसंगी युवकचे तालुकाध्यक्ष योगेश शिंदे, महिला तालुकाध्यक्ष सुनंदा गोरडे, नामदेव तांबे, सोशल मीडिया अध्यक्ष राहुल बाबर आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved