ऐकावं ते नवलंच! ‘या’ देशात AC चालवण्यासाठीही सरकारने घातल्या मर्यादा, टेंपरेचरबाबत पाळले जातात कडक नियम

Published on -

सध्या पावसाळा जरी सुरू असला तरी दमट हवामानामुळे अजूनही घरात पंखे, कूलर आणि एसीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. उन्हाळा म्हटलं तर, ही उपकरणे रात्रं-दिवस चालू ठेवावी लागतात.

पण ही सवय फक्त आपल्याला आराम देते इतकंच नाही, तर पृथ्वीच्या हवामानावरही त्याचा गंभीर परिणाम होतोय. आणि म्हणूनच, जगातील काही देशांनी एसीच्या वापरावर कठोर नियम घालून दिले आहेत, जे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

आपण जेव्हा एसी चालू करतो, तेव्हा त्यातून येणारी थंड हवा एकतर सुखद वाटते. पण याच वेळी, त्या यंत्रांमधून बाहेर पडणारी उष्णता वातावरणात मिसळते. ही गरमी म्हणजे फक्त आपल्या घरातल्या उष्णतेचा बाहेर पडलेला भाग नसतो, तर ती वातावरणात अधिक उष्णता निर्माण करते. यामुळे बाहेरील तापमान वाढतं.

‘या’ देशात एसीबाबत कडक नियम

या पार्श्वभूमीवर, अमेरिका, जपान, इटलीसारख्या विकसित देशांनी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या नागरिकांसाठी एसीच्या तापमानावर बंधनं घातली आहेत. अमेरिकेत एसीचं तापमान 21 ते 24 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवण्याचे नियम आहेत. इटलीत ही मर्यादा 23 ते 25 अंशांपर्यंत आहे आणि जपानमध्ये तर यापेक्षा कडक नियम पाळले जातात. एसीचं तापमान फक्त 26 ते 28 अंश दरम्यानच ठेवता येतं.

आपण भारतात एसी 16 किंवा 18 अंशांवर लावतो आणि मग मॉलमधून बाहेर पडताच अंगावर टाचणारा उन्हाचा फटका बसतो. यामुळे फक्त शरीराला त्रास होतो असं नाही, तर पर्यावरणालाही मोठा धक्का बसतो. वाढती उष्णता, तापमानवाढ, हवामानातील अस्थिरता यामागे मानवनिर्मित तंत्रज्ञानाचाही मोठा वाटा आहे.

तिथे हे नियम केवळ पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी नाहीत, तर आपल्या पुढच्या पिढ्यांना राहण्यासारखं पृथ्वीवरचं वातावरण राखण्यासाठी आहेत. जसं आपण पाण्याचा अपव्यय टाळतो, वीज वाचवतो, तसं एसी वापरताना काहीसे भान ठेवणं गरजेचं झालं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!