पैशाच्या तंगीने त्रस्त आहात?, ‘या’ प्रभावी वास्तु उपायांनी होईल लक्ष्मीचं आगमन!

Published on -

घरात सतत पैशाची चणचण वाटत असेल, खर्च वाढत असतील किंवा कामांमध्ये अडथळे येत असतील, तर यामागे केवळ नशीब नव्हे तर घरातील उर्जेचे संतुलनही कारणीभूत असते. आपल्या सभोवतालचा परिसर आणि वातावरण हे आपल्या जीवनावर मोठा परिणाम घडवते आणि याचाच अभ्यास म्हणजे वास्तुशास्त्र. या शास्त्रानुसार काही साधे उपाय दररोजच्या जीवनात अमलात आणल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक समृद्धीचा मार्ग खुला होतो.

घरातील वातावरण जर शांत, शुभ आणि सकारात्मक असेल, तर कोणतीही गोष्ट सहज शक्य होते. पण जर घरात नकारात्मकता पसरली असेल, तर कामांमध्ये अडथळे, पैशांची ओढाताण, आणि मानसिक अशांतता यांना आमंत्रण मिळते. म्हणूनच, काही छोटे पण परिणामकारक उपाय आपण पाळले, तर या अडचणी टाळता येऊ शकतात.

कापुर जाळा

कापूर जाळण्याचा उपाय अगदी सहज आणि प्रभावी आहे. आठवड्यातून किमान एकदा तरी घरात कापूर जाळावा. या साध्याशा क्रियेमुळे घरातील वाईट ऊर्जा दूर होते आणि वातावरण प्रसन्न बनते. कापूरच्या ज्वाळेत एक प्रकारचा शुद्ध करणारा प्रभाव असतो, जो घरात शांतता आणि स्थैर्य निर्माण करतो.

मोहरीच्या तेलाचा दिवा

 

तसेच, संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास तो एक आमंत्रण ठरतो, लक्ष्मीदेवीसाठी. ही पारंपरिक श्रद्धा केवळ धार्मिक नाही, तर ती घरात उजाळा आणि ऊर्जेचा मार्ग खुला ठेवते, असे मानले जाते.

सकाळी केलेली एक छोटी कृती म्हणजे गायीला भाकरी खाऊ घालणे देखील समृद्धीचं दार उघडते. या भाकरीत थोडा गूळ किंवा साखर घातल्यास ती आणखी शुभ मानली जाते. यामुळे केवळ धार्मिक पुण्य मिळत नाही, तर ही कृती आपल्याला निसर्गाशी जोडते आणि त्यातून संतुलन साधले जाते.

पक्ष्यांना धान्य खाऊ

तसेच, दररोज पक्ष्यांना धान्य खाऊ घालण्याची सवय लावल्यास, त्यातून एक प्रकारचा आनंद आणि समाधान मिळते. या कृतीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि अनेक वेळा कामात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करता येते.

अशाच एका साध्या पण महत्त्वाच्या बाबीकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं, टी म्हणजे झाडू लावण्याचा वेळ. वास्तुशास्त्र सांगतं की, संध्याकाळी झाडू लावू नये. हे केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहात नाही आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात, असं मानलं जातं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!