सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ भत्त्यात केली मोठी कपात

शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही अलीकडेचं सरकारी नोकरीत रुजू झाला असाल तर ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. कारण की सरकारने एका महत्त्वाच्या भत्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Published on -

7th Pay Commission : देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे केंद्रातील सरकारकडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या ड्रेस अलाउंससंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयाचा देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांना फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आता आपण केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या ड्रेस भत्यासंदर्भात सरकारने कोणता निर्णय घेतलाय आणि याचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार याचीच सविस्तर माहिती आजच्या या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सरकारचा नवा निर्णय काय सांगतो?

वित्त मंत्रालयाने मार्च 2025 मध्ये ड्रेस भत्ता बाबत एक नवीन आदेश जारी केला आहे. या नव्या आदेशानुसार, आता जुलै 2025 नंतर नियुक्त होणाऱ्या नवीन कर्मचाऱ्यांना ड्रेस अलाउंस प्रो-रेटा पद्धतीने दिला जाणार आहे. पूर्वीच्या नियमानुसार, वर्षात कधीही नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याला संपूर्ण वर्षाचा ड्रेस अलाउंस दिला जात होता. म्हणजेच जर एखादा कर्मचारी ऑक्टोबर महिन्यात नोकरीवर रुजू झाला तरी देखील त्याला संपूर्ण वर्षाचा ड्रेस भत्ता मिळत होता.

मात्र, नव्या नियमांनुसार, आता कर्मचाऱ्याला फक्त त्याच्या नियुक्तीपासून पुढील वर्षीच्या जून महिन्यापर्यंतचे भत्याचे पैसे दिले जातील. उदाहरणार्थ, जर एखादा कर्मचारी ऑक्टोबर 2025 मध्ये नियुक्त झाला असेल तर त्याला फक्त 9 महिन्यांचा ड्रेस अलाउंस मिळणार आहे, संपूर्ण 12 महिन्यांचा भत्ता मिळणार नाही. नक्कीच नव्याने जॉईन होणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे नवीन नियुक्त होणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या भत्त्यावर परिणाम होणार आहे. हा निर्णय आर्थिक संसाधनांची योग्य तर्हेने बचत करण्याच्या दृष्टीने घेतल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोणत्या कर्मचाऱ्यांना किती ड्रेस भत्ता मिळतो?

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पदानुसार ड्रेस भत्ता दिला जातो. म्हणजे ड्रेस अलाउंसची रक्कम कर्मचाऱ्याच्या सेवेवर अवलंबून असते. काही महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 20,000 रुपये वार्षिक भत्ता दिला जातो. जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, CAPF, कोस्ट गार्ड इत्यादी महत्त्वाच्या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून 20 हजार रुपयांचा भत्ता दिला जातो. RPF, स्टेशन मास्टर्स, ICLS अधिकारी अशा पदांवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपयांचा ड्रेस भत्ता दिला जातो. ट्रॅकमन, लोको पायलट, ड्रायव्हर्स या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वार्षिक पाच हजार रुपयांचा ड्रेस भत्ता मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!