‘ही’ आहे भारतातील टॉप 5 प्रायव्हेट मेडिकल कॉलेज! MBBS साठी किती पैसे मोजावे लागणार?

वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे आहे का? मग तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा राहणार आहे. आज आपण देशातील सर्वोत्कृष्ट खाजगी वैद्यकीय शैक्षणिक संस्थांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published on -

Top Medical Colleges : भारतात मेडिकल आणि इंजिनिअरिंगला शिक्षण घेणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. अनेक विद्यार्थी बारावीनंतर मेडिकल आणि इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेतात. दरम्यान जर तुम्हालाही मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची राहणार आहे.

कारण आज आपण देशातील टॉप पाच प्रायव्हेट मेडिकल कॉलेज बाबत माहिती पाहणार आहोत. खरेतर, ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय फील्डमध्ये करिअर करायचे आहे ते विद्यार्थी देशातील सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयांच्या शोधात असतात.

अशा परिस्थितीत आज आम्ही विद्यार्थ्यांसाठी देशातील प्रमुख खाजगी वैद्यकीय शैक्षणिक संस्थांची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

ही आहेत भारतातील टॉप 5 प्रायव्हेट मेडिकल कॉलेज  

Dr DY Patil Medical College, Mumbai : जर तुम्हाला मुंबई मधून मेडिकलचे शिक्षण घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज चा पर्याय बेस्ट राहणार आहे. ही वैद्यकीय शिक्षणासाठी देशातील एक प्रमुख शैक्षणिक संस्था असून या कॉलेजमध्ये एमबीबीएस साठी 27 लाख रुपये एवढी फी आहे. 

Hamdard Institute of Medical Sciences and Research, Delhi : हमदर्द इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च दिल्ली हे देखील देशातील एक प्रतिष्ठित प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे. या कॉलेजमधून जर एमबीबीएस चे शिक्षण घ्यायचे असेल तर विद्यार्थ्यांना जवळपास 78 लाख रुपयांपर्यंत फी लागू शकते. 

KS Hegde Medical Academy, Mangalore : के एस हेगडे मेडिकल अकॅडमी मँगलोर हे देखील देशातील एक नामांकित प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये एमबीबीएसची फी 17 लाख 70 हजार रुपये इतकी आहे. 

कस्तुरबा मेडिकल कॉलेज, मंगलोर, मनिपल अकॅडेमी ऑफ हायर एजुकेशन : वैद्यकीय फिल्डमध्ये जर करिअर घडवायचे असेल तर हे कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. या कॉलेजमधील एमबीबीएसची फी जवळपास 71 लाख रुपयांपर्यंत आहे. 

Amrita Institute of Medical Sciences, Kochi : अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कोची हे देखील देशातील एक नामांकित प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे.

या कॉलेजमधून जर तुम्ही एमबीबीएस ची डिग्री घेतली तर नक्कीच तुमचे करिअर सेट होणार आहे. या कॉलेजमधून एमबीबीएस चे शिक्षण घ्यायचे असेल तर साधारणतः 25 लाख रुपयांपर्यंतचे शुल्क भरावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!