अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-मागील अनेक दिवसांपासुन अहमदनगर-मनमाड राज्य मार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे अनेक अपघात होवून हा मार्ग कळीचा मुद्दा बनला होता.
याप्रकरणी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे.
अहमदनगर-मनमाड राज्य मार्गाची झालेली दुरावस्था व यावर्षी मोठ्याप्रमाणात झालेला पाऊस त्यामुळे रस्त्याची वाताहत होवून हा महामार्ग अक्षरशः मृत्युचा सापळा झाला होता.
या राज्यमार्गाची खड्ड्यांमुळे झालेली वास्तव परिस्थिती आमदार आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार अशोक चव्हाण यांची मागील महिन्यात भेट घेवून त्यांच्यापुढे मांडली होती.
या महामार्गाची वेळेत दुरुस्ती झाली नाही तर अपघाताची संख्या वाढून अनेकांना आपला जीव गमवावा लागू शकतो त्यासाठी या राज्य मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी आग्रही मागणी केली होती.
सदर मागणीची दखल घेवून अहमदनगर-मनमाड या राज्य मार्गाच्या दुरुस्तीसाठी नामदार अशोक चव्हाण यांनी ४० कोटी रूपये निधी मंजूर केला होता. त्या निधीच्या माध्यमातून या मार्गावरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आल्यामुळे या महामार्गावरून नियमितपणे ये-जा करणाऱ्या वाहन धारकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
जीवघेण्या ठरलेल्या अहमदनगर–मनमाड महामार्गाच्या खड्डे बुजवण्याच्या कामास आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून बुधवार (दि.२८) पासून कोपरगाव येथील येवला नाका परिसरातून प्रारंभ करण्यात आला असून
कोपरगाव येवला नाका ते सावळीविहीर पर्यंतच्या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम तातडीने पूर्ण करू अशी माहिती जागतिक बँक अभियंता अंकुश पालवे यांनी दिली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved