Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहक आणि गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाची स्थिती पाहायला मिळत आहे. काल सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली होती पण आज किमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे.
अशा परिस्थितीत जर तुम्हीही सोन खरेदीसाठी सराफा बाजाराच्या दिशेने निघणार असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. कारण की आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे रेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

19 जून 2025 चे रेट
मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, ठाणे, जळगाव : या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 810 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार 80 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 840 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 680 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती.
आजचे सोन्याचे भाव कसे आहेत?
मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, ठाणे, जळगाव : या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 360 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 480 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 390 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 510 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
चांदीचे भाव कसे आहेत?
आज 20 जून रोजी सोन्याप्रमाणे चांदीच्या किमतीत सुद्धा घसरण झाली आहे. 19 जून च्या तुलनेत आज चांदीच्या किमतीत किलोमागे दोन हजार रुपयांची घसरण झाली.
काल चांदीची किंमत एक लाख 12 हजार रुपये प्रति किलो एवढी होती मात्र आज याची किंमत एक लाख दहा हजार रुपये प्रति किलो इतकी झाली आहे.