PF खात्यातील माहिती चुकलीये? आता घरबसल्या नाव, मोबाईल नंबर आणि जन्मतारीख करा अपडेट; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

Published on -

पीएफ खात्यात नाव किंवा जन्मतारीख चुकीची असेल, तर अनेकांना वाटतं की आता मोठा गोंधळ होणार, कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागतील आणि अनेक कागदपत्रं घेऊन सरकारी अधिकाऱ्यांचे दरवाजे ठोठावावे लागतील. पण सध्या तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा अडचणींवर घरबसल्या सहज तोडगा निघू शकतो. आता पीएफ खात्यातील चुकीचे तपशील दुरुस्त करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करता येते.

प्रॉव्हिडंट फंड हे प्रत्येक कामगारासाठी भविष्याची शिदोरी असते. हे खाते भविष्याच्या योजनांपासून ते पेन्शन, कर्ज आणि मेडिकल सुविधांपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. त्यामुळे त्यात तुमचं नाव, जन्मतारीख किंवा इतर माहिती चुकीची असल्यास भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागू शकतं.

पण सुदैवानं, EPFO (Employees’ Provident Fund Organisation) ने आता यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ऑनलाइन प्रक्रिया समजून घ्या

तुम्हाला जर नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव, लिंग, मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी यांपैकी कोणतीही माहिती दुरुस्त करायची असेल, तर तुम्ही थेट EPFO च्या अधिकृत युनिफाइड मेंबर पोर्टलवर लॉग इन करून ही प्रक्रिया सुरू करू शकता. लॉगिनसाठी तुमचा UAN (Universal Account Number), पासवर्ड आणि कॅप्चा आवश्यक असेल.

लॉगिन केल्यानंतर, प्रोफाइल विभागात जाऊन ‘Manage’ या टॅबखाली ‘Modify Basic Details’ हा पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर योग्य माहिती भरून कागदपत्र अपलोड करावे लागतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, शाळेचा मार्कशीट किंवा बँक पासबुक यापैकी कोणतंही अधिकृत कागदपत्र वापरता येतं.

फॉर्म सबमिट केल्यानंतर तो तुमच्या संस्थेकडे म्हणजे नियोक्त्याकडे पाठवला जातो. संस्थेची मंजुरी मिळाल्यावर EPFO ही माहिती तपासून दुरुस्तीची अंतिम मंजुरी देते. पूर्ण प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण होते आणि तुमच्या पीएफ खात्यातील माहिती दुरुस्त होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!