आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी अवघ्या दीड वर्षात प्रशस्त बंगला बांधून ‘परिवर्तन’ केले !

Published on -

नेवासे :- राजकारणात सत्ताप्राप्तीनंतर गडाख, तनपुरे, घुले आदींना बंगले बांधायला दहा पंधरा वर्षे लागली. मात्र आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी अवघ्या दीड वर्षातच सर्वसुविधांनीयुक्त असा प्रशस्त बंगला बांधून ‘परिवर्तन’ केले, असा आरोप प्रशांत गडाख यांनी केला.

नेवासा तालुक्यातील देवगाव येथील राम मंदीरात पार पडलेल्या ‘संवाद’ मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अनेक युवकांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश केला. गडाख पुढे म्हणाले, आ. मुरकुटे यांनी देवगावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून फसविले.

आ. मुरकुटे यांच्या पत्नी संचालिका असलेल्या पतसंस्थेने ठेवीदारांना पैसे न दिल्याने त्यांच्या मुलींची लग्न होऊ शकली नाही. आ. मुरकुटे म्हणतात, आमरातईत बसून विकास होत नाही, मग आ. मुरकुटे वनविभागाच्या ‘काष्ट कुटी’मध्ये बसून कोणाचा विकास करतात?

यावेळी अनेकांची भाषणे झाली. विधानसभेच्या मागील निवडणुकीत गाडीच्या काचा फोडण्याचे पाप कोणी केले, याचा खुलासा काही कार्यकर्त्यांनी भाषणादरम्यान केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe