महाराष्ट्र राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ‘या’ भत्त्यात मोठी वाढ ! राज्य शासनाचा जीआर पहा….

महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाकडून नुकताच एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयातून एका महत्त्वाच्या भत्यात वाढ झाली आहे आणि आज आपण याच संदर्भातील डिटेल माहिती पाहणार आहोत.

Published on -

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून नुकताच एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

खरे तर, सामान्य प्रशासन विभागातील राजशिष्टाचार उपविभागाच्या अधिनस्त असलेल्या राज्य अतिथीगृहातील अधिकारी/कर्मचारी यांच्या गणवेशाच्या वित्तीय मर्यादेत सुधारणा करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून महत्त्वाचा जीआर जारी करण्यात आला आहे.

दरम्यान आता आपण हा शासन निर्णय नेमका काय आहे आणि याद्वारे कोणत्या भत्यात सुधारणा करण्यात आली आहे याबाबतची डिटेल माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

कसा आहे GR ?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार उपविभागाच्या अधिनस्त असलेल्या राज्य अतिथीगृहातील कर्मचाऱ्यांना पुरविण्यात यावयाच्या गणवेशाच्या वित्तीय मर्यादेत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. दरम्यान हीच बाब विचारात घेता आता एक जीआर निर्गमित करण्यात आला आहे.

या GR नुसार, सामान्य प्रशासन विभागातील राजशिष्टाचार उपविभागाच्या अधिनस्त असलेल्या राज्य अतिथीगृहातील अधिकारी/कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा, प्रती कर्मचारी एकूण तीन गणवेश शासन निर्णयात नमूद केलेल्या सुधारित दराने मंजूर करण्यात येत आहे. 

किती वाढला गणवेश भत्ता ? 

राज्य शासनाच्या जीआर नुसार, अधिपत्याखालील सह्याद्री व नंदगिरी अतिथीगृहातील कर्मचाऱ्यांच्या गणवेष भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. ही सुधारित वित्तीय मर्यादा प्रति कर्मचारी/प्रति गणवेष या निकषावर ठरवण्यात आली आहे.

दोन वर्षांत एकदा देण्यात येणाऱ्या या भत्त्याचा लाभ सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, मुख्य बटलर, भांडारपाल, बटलर, खानसामा, किचन हेल्पर, स्टोअरमन आणि शिपाई यांचा समावेश आहे.

व्यवस्थापकाचा सुधारित गणवेश भत्ता प्रति कर्मचारी/प्रति गणवेश 9000 रुपये इतका करण्यात आला आहे. सहाय्यक व्यवस्थापक, मुख्य बटलर, भांडारपाल यांचा सुधारित गणवेश भत्ता प्रति कर्मचारी/प्रति गणवेश 8450 रुपये इतका करण्यात आला आहे.

बटलर सुधारित गणवेश भत्ता प्रति कर्मचारी/प्रति गणवेश 5 हजार 850 रुपये इतका करण्यात आला आहे. खानसामाचा सुधारित गणवेश भत्ता प्रति कर्मचारी/प्रति गणवेश 5 हजार 200 रुपये इतका करण्यात आला आहे.

किचन हेल्पर, स्टोअरमन आणि शिपाई या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गणवेश भत्ता प्रति कर्मचारी/प्रति गणवेश 3 हजार 900 रुपये इतका करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!