Gold Rate Today : दहा दिवसांपूर्वी सोन्याची किंमत एक लाख पेक्षा कमी होती. मात्र आता सोन्याची किंमत एका लाखाहून अधिक झाली आहे. रिपोर्टनुसार दहा दिवसांपूर्वी अर्थातच 12 जून 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 280 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट ची किंमत 91 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.
पण यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली 13 जून पासून या मौल्यवान धातूच्या किमती सातत्याने वाढत आहेत. एप्रिल महिन्यानंतर 13 जून रोजी पहिल्यांदाच सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली, या दिवशी याची किंमत एक लाख एक हजार चारशे रुपये एवढी नमूद करण्यात आली.

दुसऱ्या दिवशी अर्थातच 14 जून रोजी याची किंमत 1 लाख 1 हजार 680 रुपये एवढी नमूद करण्यात आली. नंतर या मौल्यवान धातूच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू राहिले आणि काल अर्थातच 21 जून 2025 रोजी सोन्याची किमतीत वाढ पाहायला मिळाली.
20 जून 2025 रोजी 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे अनुक्रमे सहाशे रुपयांची आणि 550 रुपयांची घसरण झाली होती.
मात्र 21 तारखेला 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचा किमतीत दहा ग्रॅम मागे अनुक्रमे 270 रुपयांची आणि 250 रुपयांची वाढ झाली. अशा परिस्थितीत आज आपण 22 जून 2025 रोजी दहा ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत याचा आढावा आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे रेट
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : आज 22 जून 2025 रोजी महाराष्ट्रातील या प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 560 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 750 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : आज 22 जून 2025 रोजी महाराष्ट्रातील या प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 590 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 380 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 770 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.