आ.भाऊसाहेब कांबळेंनी स्व.जंयतराव ससाणेंना फसविले !

Ahmednagarlive24
Published:

श्रीरामपूर :- काँग्रेस पक्षाचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना सलग दोन वेळा आमदार करण्यासाठी स्व. जंयतराव ससाणे यांनी प्रयत्न केले. पंरतु ससाणे यांनादेखील आ. कांबळे यांनी फसवले. स्व. ससाणे समर्थक आमदार कांबळे यांच्यावर नाराज होते.

त्यांनी लोकसभेला उघड आमदार कांबळेंविरुध्द काम केलं. लोकसभा निवडणूक आमदार कांबळे यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांची साथ घेत निवडणूक लढवली.

पंरतु कांबळेंना पराभवाला सामोरे जावे लागले. आमदार कांबळेना विरोध करणारे नामदार विखे आता कांबळेचा प्रचार करणार का, असा सवाल शिवमल्हार सेनेचे अध्यक्ष दतात्र खेमनर यांनी उपस्थित केला आहे.

भाजप शिवसेना युती होईल की नाही, हे अध्याप स्पष्ट नाही. पंरतु शिवसेने आमदार कांबळेंना प्रवेश दिला आहे. मात्र लहू कानडे, रामचंद्र जाधव हे नाराज आहेत. दुसरीकडे खासदार लोखडे यांना शिवसेने शांत केले आहे. आज लोखडे आमदार कांबळे प्रवेशाला उपस्थित होते.

शिवसेना पक्ष आमदार कांबळेंना उमेदवारी देणार असेल तर ससाणे गट काय करणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. विखेंनीच मदार कांबळे शिवसेनेत पाठवले नाही ना, अशा उलट सुलट चर्चा श्रीरामपुरात सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment