7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहेत. ही बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी सुद्धा महत्त्वाची आहे. खरंतर जून महिन्याच्या पगारांसोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारकांना तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे.
जून महिन्याचा पगार जुलै महिन्याच्या सुरुवातीला दिला जाईल आणि यासोबत सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारकांना तीन महत्त्वाचे लाभ मिळणार आहेत. अशा परिस्थितीत, आता आपण कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना कोणकोणते लाभ मिळणार याचा आढावा घेणार आहोत.

महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार?
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 पासून 55% दराने महागाई भत्ता दिला जात आहे. आधी हा महागाई भत्ता 53% इतका होता मात्र मार्च महिन्यात केंद्रातील सरकारने एक शासन निर्णय जारी केला ज्याद्वारे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवून 55% करण्यात आला,
पण ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली. दरम्यान आता केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा तसेच पेन्शन धारकांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित केला जाणार आहे.
जून महिन्याच्या अखेरपर्यंत या संदर्भातील शासन निर्णय जारी होण्याची शक्यता आहे. फडणवीस सरकार राज्य शासकीय सेवेतील कार्यरत कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के इतके करणार आहे.
याबाबतचा प्रस्तावित्त विभागाकडून तयार असून लवकरच या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी होईल असे बोलले जात आहे. महत्त्वाची बाब अशी की ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे.
महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार
राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका केला जाणार आहे म्हणजेच महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला जाईल आणि याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जून महिन्याच्या अखेरपर्यंत निघू शकतो.
महत्त्वाची बाब अशी की ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहणार आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे. जून महिन्याच्या पगारा सोबत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे.
सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मिळणार
महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जून महिन्यात आणखी एक मोठा लाभ मिळणार आहे तो म्हणजे सुधारित वेतन श्रेणीचा. खरेतर राज्य सरकारने वेतनत्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या 104 संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यास मंजुरी दिलेली आहे.
ह्या शिफारशी सरकारकडून स्वीकृत करण्यात आले आहेत आणि जून महिन्याच्या पगारांसोबत सुधारित वेतन श्रेणीचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर सुधारित वेतनश्रेणी दि.01.01.2016 पासुन काल्पनिकरित्या लागु करण्यात आली आहे.
तसेच प्रत्यक्ष लाभ जुन महिन्यांच्या वेतनासोबत दिला जाणार आहे. म्हणजेच याची थकबाकी काही मिळणार नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये या विरोधात नाराजी सुद्धा दिसून येत आहे.