अहिल्यानगर जिल्ह्यातील एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरासाठी सुरू झाली नवीन बससेवा, कस असणार टाईमटेबल ?

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री विठुरायाच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्हाला आषाढी एकादशी निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनाला जायचे आहे का? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे कारण की एसटी महामंडळाकडून नगर जिल्ह्यातून श्रीक्षेत्र पंढरपूरसाठी एक विशेष बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Published on -

Ahilyanagar Bus News : अहिल्यानगर जिल्ह्यातील लाल परी च्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एसटी महामंडळाकडून जिल्ह्यातील प्रवाशांसाठी एक नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. खरंतर पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविक भक्तांची मोठी वर्दळ पाहायला मिळणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकऱ्यांची मोठी गर्दी होणार आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठुरायांच्या दर्शनासाठी एकवटणार आहे.

अहिल्या नगर जिल्ह्यातील वारकरी देखील मोठ्या प्रमाणात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणार आहेत आणि याच वारकऱ्यांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाच्या माध्यमातून एका नव्या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड ते श्रीक्षेत्र पंढरपूर यादरम्यान ही नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आज 22 जून 2025 रोजी ही नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो कीस श्रीक्षेत्र देवगड व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांकडून देवगड ते पंढरपूर यादरम्यान नवीन बसेसेवा सुरू झाली पाहिजे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केली जात होती.

दरम्यान परिसरातील भाविकांची हीच मागणी लक्षात घेता श्रीक्षेत्र देवगड ते श्री क्षेत्र पंढरपूर यादरम्यान आजपासून नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या परिसरातील वारकऱ्यांची आणि भाविक भक्तांच्या मागणीची प्रत्यक्षात दखल घेत नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी रविवारी ही एसटी बससेवा सुरु केली झाली आहे.

गुरुवर्य भास्करगिरी महाराज आणि आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी या बसचे विधिवत पुजन करुन ही बससेवा सुरु करण्यात आली आहे. एसटी महामंडळाकडून सुरू करण्यात आलेल्या या नव्या बससेवेमुळे आषाढी एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान ही नवीन बससेवा सुरू झाली असल्याने परिसरातील वारकऱ्यांकडून एसटी महामंडळाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे तसेच आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचे सुद्धा कौतुक केले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!