आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूरला गेलात तर ‘या’ 5 मंदिरांना भेट द्यायला विसरू नका !

पुढील महिन्यात लाखो वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे गर्दी करणार आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे वारकऱ्यांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान जर तुम्हीही पुढील महिन्यात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणार असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे.

Published on -

Pandharpur News : दरवर्षी आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे एकवटतात.

आषाढी एकादशीला विठुरायांचे दर्शन घेणे हे प्रत्येक वारकऱ्याचे एक स्वप्न असते आणि यामुळे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकऱ्यांची मोठी गर्दी आपल्याला दिसून येते.

खरे तर पंढरपूर येथे आपण विठू माऊली चे दर्शन घेण्यासाठी जातो, पंढरपूरला गेलो की विठोबा रखुमाईच्या मुख्य मंदिराला आपण आवर्जून भेट देतो.

पण जर तुम्ही श्रीक्षेत्र पंढरपूर येथे गेलात तर मुख्य मंदिरासमवेतच आणखी 4 मंदिरांना आवर्जून भेट द्यायला हवी आणि आज आपण याच चार मंदिरांची माहिती पाहणार आहोत. 

या मंदिरांनाही अवश्य भेट द्या 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर : बा विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी आतुर असतात, पंढरपुरात गेल्यानंतर विठू माऊली चे दर्शन कधी होणार याची ओढ तमाम वारकऱ्यांना लागलेली असते.

यामुळे लाखो वारकरी पंढरपुरात गेल्यानंतर स्नान झाले की लगेचच बा विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर म्हणजेच मुख्य मंदिरात तुम्ही पहिले दर्शन घ्या.

श्री गोपाल कृष्ण मंदिर : तुम्ही आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे गेला तर श्रीगोपाल कृष्ण मंदिराचे दर्शन घ्यायला विसरू नका नाहीतर तुमची वारी अपूर्ण राहू शकते.

असं म्हणतात की श्री गोपाल कृष्ण मंदिरात दर्शन घेतले नाही तर वारी अपूर्ण राहते. हे मंदिर गोवर्धन पर्वतावर स्थित आहे. हे मंदिर किल्ल्यासारखे दिसते. या मंदिरात भगवान श्रीकृष्णाची गिरणी व स्वयंपाक घराची रचना आहे. 

पुंडलिक मंदिर : विठुरायाच्या दर्शनानंतर तुम्ही बा विठोबाचे असीम भक्त पुंडलिकाचे दर्शन घ्यायला हवे, हे मंदिर चंद्रभागा नदीच्या काठी वसलेले आहे. हे मंदिर ज्या ठिकाणी भक्त पुंडलिकाने बा विठोबाला विटेवर उभे राहण्यास भाग पाडले त्या ठिकाणी वसलेले आहे. यामुळे जर तुम्ही श्रीक्षेत्र पंढरपूरला गेलात तर चंद्रभागा तिरी असणाऱ्या भक्त पुंडलिक मंदिरात जाऊन पुंडलिकाचे दर्शन घ्यायला विसरू नका.

इस्कॉन मंदिर : पंढरपुरातील इस्कॉन मंदिरात जाऊन देखील अवश्य दर्शन घ्यायला हवे. हे मंदिर 1980 मध्ये बांधण्यात आले असून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठुरायांच्या दर्शनानंतर तुम्ही या मंदिरात जाऊन अवश्य दर्शन घ्यायला हवे. 

विष्णुपद मंदिर : पंढरपुरातील आणखी एक महत्त्वाचे मंदिर म्हणजेच विष्णुपद मंदिर. हे मंदिर भीमा नदीच्या काठी आहे. असं म्हणतात की या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या पावलांचे ठसे पाहायला मिळतात. हे मंदिर गोपालपुर रोड येथे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!