Ahilyanagar News : अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. फडणवीस सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला या दोन्ही जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या अशा नऊ रस्ते विकासाच्या प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की येत्या दोन वर्षांनी नाशिक येथील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे महा कुंभाचे आयोजन होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा 2027 श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संपन्न होणार असून याचं सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

नाशिक शहरासमवेत जिल्ह्यातील तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. खरे तर 2027 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या कुंभ मेळ्याला जगभरातील हिंदू सनातनी लोक भेटी देणार आहेत.
यामुळे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक श्री क्षेत्र शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे सुद्धा दर्शनासाठी जाणार आहेत. यामुळे नाशिक समवेतच अहिल्यानगर जिल्ह्यातील रस्त्यांची कामे देखील करणे अनिवार्य आहे.
दरम्यान हीच बाब विचारात घेऊन आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून या दोन्ही जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या अशा नऊ रस्ते विकासाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. सीएमोकडून अर्थातच राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
‘या’ रस्ते विकासाच्या प्रकल्पांना मिळाली मंजुरी
CMO Maharashtra ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी काही महत्त्वाच्या रस्ते विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
या मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे केवळ वाहतुकीला गती मिळणार नाही तर लाखो भाविकांचा प्रवास सोपा आणि सुकर होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
घोटी – पाहिने – त्र्यंबकेश्वर जव्हार फाटा
द्वारका सर्कल – सिन्नर आयसी 21 (समृद्धी महामार्ग) नांदूर शिंगोटे – कोल्हार
नाशिक ते कसारा
सावली विहीर (आय सी 20 समृद्धी महामार्ग) शिर्डी – शनिशिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द)
नाशिक ते धुळे
त्र्यंबकेश्वर – जव्हार – मनोर
सावली विहीर – मनमाड – मालेगाव
घोटी – सिन्नर – वावी – शिर्डी
शनिशिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द) अहिल्यानगर (खरवंडी फाटा)
https://www.instagram.com/p/DLNlo7IBWL0/?igsh=bHBvaDM0bmVoamFj
नक्कीच, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील या महत्त्वाच्या रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली तर सिंहस्थ कुंभमेळा साठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
या प्रकल्पांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजुरी मिळाली असल्याने आता लवकरच या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. या प्रकल्पांची कामे फास्टट्रॅक वर केली जाणार आहेत कारण की येत्या दोन वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे.