भारतातील ‘या’ राज्यात सापडला जगातील सर्वात मोठा साप ! अखेरकार पुराणात उल्लेख असलेल्या ‘नाग वासुकी’चे अस्तित्व सापडलेच?

तुम्ही कधी पंधरा मीटर लांबीचा साप पाहिला आहे का ? जगातील सर्वाधिक लांबीचा साप तुम्ही कधी पाहिला आहे का ? नाही ना, पण आता जगातील सर्वाधिक लांबीच्या सापाचे अस्तित्व आपल्या भारतात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Published on -

Worlds Largest Snake : भारतात साधुसंतांचा आणि वेद पुराणांचा देश. आपल्या वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये असणारे ज्ञान इतर कोणत्याच धर्माच्या धर्मग्रंथांमध्ये आढळत नाही. हिंदू सनातन धर्मात असंख्य धर्मग्रंथ आहेत जे की समाजाला योग्य दिशा दाखवत आहेत.

दरम्यान पुराणात सांगितलेल्या अनेक गोष्टी आता हळूहळू जगासमोर येत आहेत. अशातच आता पुराणाशी निगडित एक महत्त्वाचा शोध जगासमोर आला आहे. पुरानात ज्या वासुकी नागाचा उल्लेख करण्यात आला आहे त्या वासुकी नागाचे अस्तित्व सापडले असल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. 

या भागात आढळले वासुकी नागाचे अस्तित्व 

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील पाणंध्रो लिग्नाइट खाणीत शास्त्रज्ञांना एका खूप जुन्या आणि प्रचंड मोठ्या सापाचे जीवाश्म सापडले आहेत. दरम्यान, हे महाकाय सापाचे जीवाश्म वासुकी नागाचे असू शकतात अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

खरेतर, हा साप सुमारे 4.7 कोटी वर्षांपूर्वी दलदलीच्या भागात आढळला होता. या सापाच्या काही पाठीच्या हाडांची स्थिती आजही त्याच स्थितीत आढळली आहे ज्या त्या काळात होत्या.

त्याची लांबी आणि आकार पाहता, शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हा आतापर्यंत सापडलेल्या सर्वात मोठ्या सापांपैकी एक असू शकतो. हा शोध पुराणात सांगितलेल्या वासुकी नागाचे अस्तित्व सिद्ध करणारा आहे अशा काही चर्चा सुद्धा आता सध्या सुरू आहेत.

दुसरीकडे, जीवाश्मशास्त्राच्या क्षेत्रातील ही एक मोठी उपलब्धी सुद्धा समजली जात आहे. या महाकाय सापाच्या जीवाश्मात, पाठीच्या कण्यातील 27 हाडे अजूनही चांगल्या स्थितीत आढळतात. शास्त्रज्ञांनी या सापाला वासुकी इंडिकस असे नाव सुद्धा दिले आहे.

हे नाव हिंदू धर्मातील भगवान शिवाच्या गळ्यात गुंडाळलेल्या पौराणिक सर्प वासुकीपासून प्रेरित असल्याचे सांगितले गेले आहे. हा शोध एक मोठे यश मानले जात आहे, कारण असे मानले जाते की या सापाची लांबी 11 ते 15 मीटर असेल.

ही लांबी दक्षिण अमेरिकेच्या उबदार भागात आढळणाऱ्या आणि आता नामशेष झालेल्या टायटानोबोआ नावाच्या सापाएवढी आहे. खरेतर, 2005 मध्ये आयआयटी रुरकीच्या शास्त्रज्ञांना कच्छमधील एका कोळसा खाणीत एका महाकाय सापाचे सांगाडे सापडले होते.

शास्त्रज्ञांना या महाकाय सापाचे तब्बल 27 सांगाडे सापडलेत. महत्वाची बाब अशी की यातील काही हाडे एकमेकांशी जोडली गेली होती. तेव्हापासून, हे जीवाश्म महाकाय मगरीसारख्या प्राण्याचे अवशेष मानले जात होते.

मात्र आता या सांगाड्यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर एक नवीन शोध लागला आहे. दीर्घ संशोधनानंतर, शास्त्रज्ञांनी आता जाहीर केले आहे की 2005 मध्ये सापडलेले हे सांगाडे एका मोठ्या सापाचे आहेत. विशेष बाब अशी की हा शोध ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की वासुकी इंडिकस हा एक मंद गतीने चालणारा शिकारी होता, जो अचानक हल्ला करून आपला शिकार पकडत असे. त्याची शिकार करण्याची पद्धत आजच्या अजगर आणि अॅनाकोंडासारखीच असावी असे सुद्धा निरीक्षण या शास्त्रज्ञांनी नोंदवण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!