‘ही’ आहे जगातील सर्वाधिक महागडी शाळा ! एका वर्षाची फी पाहूनच डोळे पांढरे होतील

जगातील सर्वाधिक महागडी शाळा कोणती आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? नाही ना मग आज आपण जगातील सर्वाधिक महागड्या शाळेची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Expensive Schools : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा सुरू झाले आहे. राज्य बोर्डाच्या 25 जिल्ह्यांमधील शाळा 16 जून पासून आणि विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील शाळा 23 जून पासून सुरू झाल्या आहेत.

सध्या शाळेचे अगदीच सुरुवातीचे दिवस आहेत आणि विद्यार्थी नवीन वर्गात प्रवेश मिळाला असल्याने मोठे उत्साही आहेत. खरे तर आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे यासाठी पालक पैशांची कुठलीही तमा न बाळगता चांगल्या शाळेत विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करून देत असतात.

शिक्षणासाठी पालकांकडून जेवढा शक्य आहे तेवढा पैसा खर्च केला जातो. पण तुम्हाला जगातील सर्वाधिक महागड्या शाळेबाबत माहिती आहे का? नाही ना मग आज आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती जाणून  घेणार आहोत. 

ही आहे जगातील सर्वाधिक महागडी शाळा 

मिळालेल्या माहितीनुसार, स्वित्झर्लंडमधील के रोले या शहरातील Institute Le Rosey ही जगातील सर्वाधिक महागडी शाळा आहे. या शाळेत फारच मोजक्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळू शकते.

ही शाळा 100% बोर्डिंग स्कूल आहे. असं म्हणतात की या शाळेत एका देशातील जास्तीत जास्त दहा टक्के विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे या शाळेतील वार्षिक फी मध्ये तुम्ही मुंबईतील एखाद्या पॉश एरियामध्ये स्वतःचे घर घेऊ शकता.

या शाळेची फी ही फारच अधिक आहे मात्र असे असतानाही येथे अनेक विद्यार्थी ऍडमिशन घेत आहेत. ही शाळा 1880 मध्ये सुरू झाली आहे आणि तेव्हापासून अविरतपणे या शाळेचे संचालन सुरू आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातोय. 

शाळेची फी किती आहे  

मीडिया रिपोर्टनुसार स्वित्झर्लंड मधील जगातील या सर्वाधिक महागड्या शाळेची वार्षिक फी 86 लाख रुपये म्हणजेच एक लाख डॉलर एवढी आहे. या ठिकाणी जगभरातील अनेक राजा महाराजांच्या मुलांनी शिक्षण घेतलेले आहे.

अजूनही अनेक राजकारण्यांची आणि नामांकित व्यक्तींची मुले या शाळेत शिकत आहेत. या शाळेला स्कूल ऑफ किंग अशी उपाधी देण्यात आली आहे.

या शाळेचे कॅम्पस फारच शानदार आहे या शाळेत विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज शिकवल्या जातात. संगीत, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारच्या गोष्टी या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवल्या जात आहे.

या ठिकाणी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी देखील सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. ही शाळा जवळपास 28 हेक्टर जमिनीवर उभारण्यात आली आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!