Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुणे रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे.
दरम्यान आता याच पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या कामासात एमएसआरडीसीने एक मास्टर प्लॅन रेडी केला आहे. पुणे जिल्ह्यासाठी आणि सबंध महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पुणे रिंगरोड प्रकल्पाला आता वेग मिळाला आहे.

कारण आतापर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या प्रकल्पासाठी जवळपास 1,740 हेक्टरपेक्षा अधिक जमीन संपादित करण्यात आली आहे. खरे तर पुणे रिंग रोडचे काम पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागण्यात आली आहे.
दरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पश्चिम रिंग रोड साठी आत्तापर्यंत 99% इतक्या जमिनीचे संपादन पूर्ण करण्यात आले आहे आणि पूर्व रिंग रोड साठी 98% इतक्या जमिनीचे संपादन पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान, आता आपण या प्रकल्पाच्या संदर्भात काय नवीन अपडेट समोर आली आहे याचा आढावा घेणार आहोत.
काय आहे नवीन अपडेट ?
पुणे रिंग रोड हा प्रकल्प 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता आहे. या रस्त्यासाठी सुमारे 42 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाचे काम पूर्व आणि पश्चिम भागात विभागण्यात आले असून, याच्या पूर्व भागात 7 व पश्चिम भागात 5 टप्पे असतील.
दरम्यान या प्रकल्पाच्या कामासाठी एकूण नऊ कंत्राटदार कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे टेंडर प्रक्रियाअंतर्गत फायनल झालेल्या कंपन्यांना अडीच वर्षांत म्हणजेच 30 महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महत्त्वाची बाब अशी की पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या प्राथमिक कामांना वाडेबोल्हाई, खडकवासला, मुळशी, उर्से, चाकण, सिंहगड, हिंजवडी आणि सोरतापवाडी परिसरात सुरुवात झाली आहे. सध्या या भागात जमीन सपाटीकरण, माती भराव, पूल बांधणी यासारखी कामे सुरू आहेत.
मात्र पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर काही कामे तात्पुरती थांबवली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एमएसआरडीसीने हा प्रकल्प ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण व्हावा यासाठी एमएसआरडीसीने एक नवा प्लॅन तयार केला आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाने ठेकेदारांनी जर वेळेत काम पूर्ण केले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. ज्या कंपन्या वेळेत काम पूर्ण करणार नाहीत त्यांच्याकडून एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल असे एमएसआरडीसीने म्हटले आहे.