सोन्याच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण! 25 जून 2025 रोजी 10 ग्रॅम दागिने खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

सोन खरेदीच्या तयारीत आहात का? अहो मग आजची बातमी खास आहे. खरे तर सोन खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना आज पुन्हा दिलासा मिळाला आहे, कारण की आज सलग तिसऱ्या दिवशी या मौल्यवान धातूच्या किमतीत घसरण झाली आहे. 

Published on -

Gold Price Today : सोन खरेदीच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरे तर गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत घसरण होत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी या मौल्यवान धातूच्या किमतीत घसरन झाली आहे आणि यामुळे नव्याने सोन खरेदी करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे.

तर दुसरीकडे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची यामुळे थोडी चिंता सुद्धा वाढलेली आहे. तीन दिवसांपूर्वी अर्थातच 22 जून रोजी या मौल्यवान धातूच्या 24 कॅरेटची किंमत एक लाख 750 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट ची किंमत 92 हजार 350 रुपये इतकी होती.

मात्र 23 जूनला 24 कॅरेट ची किंमत एक लाख 690 रुपये प्रति 10 g आणि 22 कॅरेट ची किंमत 92 हजार 300 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी झाली. पुढे 24 जूनला 24 कॅरेट ची किंमत एका लाखापेक्षा कमी झाली.

काल म्हणजे 24 जून 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 220 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी झाली, म्हणजेच याची किंमत 1470 रुपयांनी कमी झाली. 22 कॅरेट सोन्याची किंमत काल 1350 रुपयांनी कमी झाली आणि 90 हजार 950 रुपयांपर्यंत खाली आली.

अशा परिस्थितीत आज आपण 25 जून 2025 रोजी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, ठाणे, नागपूर, जळगाव, लातूर, वसई विरार, भिवंडी या प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे रेट कसे आहेत याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. 

25 जून 2025 रोजीचे सोन्याचे रेट

मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,410 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट ची किंमत 90 हजार 940 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेटची किंमत 99 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. म्हणजे आजही सोन्याच्या किमतीत घसरण झालेली आहे.

नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,440 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट ची किंमत 90 हजार 970 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेटची किंमत 99 हजार 240 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. म्हणजे आजही या शहरांमध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत घसरण झालेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News