नोकरीतील अपयश आणि दारिद्र्य होईल दूर! घरात लावा ‘हे’ खास चित्र, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

Published on -

घरामध्ये सुख, समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य नांदावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अनेकवेळा आपण मेहनत करत राहतो, पण योग्य दिशा मिळत नाही. अशा वेळी वास्तुशास्त्रातील काही उपाय आपल्या आयुष्यात आश्चर्यकारक सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. त्यातील एक अतिशय प्रभावी उपाय म्हणजे 7 धावत असलेल्या घोड्यांचे चित्र घरात लावणे.

वास्तुशास्त्र आणि फेंगशुई या दोन्ही पद्धतींमध्ये 7 घोड्यांचे चित्र हे प्रगती, वेग, ताकद आणि यशाचे प्रतीक मानले जाते. घोडा हा प्राचीन काळापासून पराक्रम, शौर्य आणि स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. विशेषतः सात घोड्यांचे धावताना असलेले चित्र ही समृद्धी आणि आर्थिक भरभराटीची सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं, असं मानलं जातं.

दिशा महत्वाची

मात्र हे चित्र कुठे आणि कसं लावायचं यालाही एक विशिष्ट शास्त्रीय दृष्टीकोन आहे. वास्तुशास्त्रानुसार, 7 घोड्यांचे चित्र घराच्या उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावले पाहिजे. कारण ही दोन्ही दिशा आर्थिक आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढवतात. चुकीच्या दिशेला किंवा अयोग्य पद्धतीने लावले तर अपेक्षित लाभ मिळत नाही.

या चित्रात घोडे धावत असावेत आणि शक्यतो पांढऱ्या रंगाचे असावेत, कारण पांढरा रंग शुद्धतेचा आणि चैतन्याचा प्रतीक मानला जातो. उभे असलेले, थांबलेले किंवा अर्धवट चित्र टाळा, कारण अशा प्रकारचे चित्र घरात अडथळे आणि स्थैर्याचा अभाव दर्शवू शकतात.

घरात कुठे लावाल चित्र?

चित्र कुठे लावायचं हेही महत्त्वाचं आहे. ते लिव्हिंग रूममध्ये किंवा ऑफिसच्या मुख्य भिंतीवर लावणं योग्य ठरतं. दुकानात देखील मुख्य दरवाजाच्या समोरच्या भिंतीवर हे चित्र लावल्यास आर्थिक व्यवहारात प्रगती होते, असं मानलं जातं. मात्र, हे चित्र कधीही बेडरूममध्ये लावू नये, कारण अशा ठिकाणी हे शुभ परिणाम देत नाही.

हे चित्र लावताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ते पूर्ण, स्वच्छ आणि न तुटलेलं असावं. घोड्यांची दिशा घराच्या आत पाहणारी असावी म्हणजे ती सकारात्मक ऊर्जा घरात खेचेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!