अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- कर्जत आणि जामखेडने स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेतला आहे. त्यासाठी स्थानिक नागरिक, पदाधिकारी, प्रशासन यांच्या सोबतीला स्थानिक आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार देखील या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत.
दरम्यान यावेळी बोलताना आमदार पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार म्हणाल्या कि, जोपर्यंत कर्जत जामखेड ही शहरे स्वच्छता अभियानात पहिल्या पाचमध्ये येत नाहीत.
तोपर्यंत मी कसलाही सत्कार स्विकारणार नाही, सन्मान घेणार नाही. माझा हा संकल्प चांगल्या कामासाठी आहे, असे प्रतिपादन सुनंदा पवार यांनी केले.
स्वच्छ सर्वेक्षणात जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेडने सहभाग घेतला आहे. या मोहिमेसाठी खुद्द आमदार पवार यांच्या मातोश्रींनी पुढारक घेतला आहे.
त्यांनी मतदार संघात प्रभागवार बैठका घेण्यास सुरुवात केली आहे व सर्वाचे मतपरिवर्तन करत आहेत. त्यांनी या मोहिमेच्या महत्वाबरोबरच गावाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कर्जत जामखेड मतदारसंघाचे नाव उंचावण्यासाठी सर्वानी यामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे असे आवाहन सुनंदा पवार यांनी केले.
दरम्यान या मोहिमेअंतर्गत दोन्ही शहरातील नागरिकांच्या वॉर्ड निहाय बैठका घेवून संवाद साधून स्वच्छते संदर्भात जागृती करण्याचे काम सध्या सुरु आहे.केवळ जागृतीच नाही तर सुनंदा पवार स्वतः हातात खोरे-टिकाव घेवून अधिकार्यांसोबत श्रमदान करताना दिसत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved