कर्जत :- नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या महासंग्राम युवा मंचचा आज कर्जत येथे संकल्प महामेळावा होत आहे.
कर्जत व जामखेड शाखांच्या वतीने होत असलेल्या मेळाव्यातून राऊत हे फक्त शक्तिप्रदर्शन करणार की कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारी करणार

हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राऊत यांच्या मेळाव्याकडे मतदार संघाचे लक्ष लागून राहिले आहे.

महासंग्राम युवा मंच हे नामदेव राऊत यांना मानणाऱ्या तसेच स्वतंत्र महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या युवकांचे संघटन आहे. नामदेव राऊत यांना आमदार बनवण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेले युवक यामध्ये सक्रिय आहेत.
त्यादृष्टीनेच मतदारसंघातील दोन्ही तालुक्यांच्या शाखा सक्रियपणे कार्यरत आहेत. राजकारणातील स्पर्धकांना धडकी भरविणारे आणि उच्चांकी गर्दीचे सामाजिक उपक्रम ‘महासंग्राम’ने वेळोवेळी घेतलेले आहेत.
सामूहिक विवाह सोहळा, कन्यादान, चला हवा येऊ द्या , अशा कार्यक्रमांच्या आयोजनातून नामदेव राऊत यांचे नाव वेगळ्या उंचीवर गेलेले आहे.’देवा गृप’ नावानेही तालुक्यात त्यांचे मोठे संघटन आहे. राऊत हे ओबीसींचे नेते आहेत.
सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याची त्यांची भूमिका जनाधार वाढविण्यासाठी मोलाची ठरत आहे. गावागावात त्यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे. ‘दुसऱ्यासाठी किती दिवस झटायचे, आपला माणूस आमदार झाला पाहिजे” अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.
कोणत्याही परिस्थितीत आपल्या नेत्याला आमदार बनवण्याचे स्वप्न ‘महासंग्राम’मधील युवक बाळगून आहेत. ‘आपला माणूस आपला आमदार’, कर्जत आमची पंढरी- देवा आमचा विठ्ठल’ अशा टॅगलाईन युवा मंचकडून सोशल मीडियात वापरल्या जात आहेत.
नामदेव राऊत हे संकल्प मेळाव्यातील एकमेव मार्गदर्शक असून ते कार्यकर्त्यांच्या मनातील सुप्त इच्छा पूर्ण करण्याबाबत स्पष्टपणे बोलतील ही अपेक्षा आहे. राऊत यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतल्यास पालकमंत्री राम शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत.
- रोड ट्रिपवर जाताना बॅगमध्ये ‘या’ वस्तु आठवणीने ठेवाच, प्रवास होईल एकदम खास!
- मातीशी नाळ जपणारा नेता! कुस्ती आखाड्यात नगरकरांनी अनुभवला सुजय विखे पाटलांचा साधेपणा
- भारतातील सर्वाधिक Top 9 श्रीमंत राज्यांची यादी जाहीर ! पहिल्या क्रमांकावर कर्नाटकाची बाजी, महाराष्ट्राचा नंबर कितवा ?
- फेंगशुईनुसार बनवा घरातील किचन, कायम बरसेल धन-सुखाची कृपा!
- सर्वाधिक विक्री होणारा Samsung Galaxy S24 FE तब्बल 24 हजारांनी स्वस्त! पाहा कुठे सुरुये ही भन्नाट डील?