वाहतुकीसाठी मार्ग सुरळीत करून द्या; राधाकृष्ण विखेंच्या प्रशासनाला सूचना

Published on -

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर मनमाड रस्त्याच्या निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहाणी करून या मार्गाचे काम तातडीने सुरू होण्याबाबत अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली.

या बैठकीस अधीक्षक अभियंता कुलकर्णी, जागतिक बँकेचे प्रतिनिधी पालवे, कनिष्ठ अभियंता बांगर आदी उपस्थित होते. यापूर्वी या मार्गावरील परिस्थितीचे गांभीर्य त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

या रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी 40 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आ.विखे पाटील यांना देण्यात आले होते. या मार्गावर होणारी वाहातुकीची कोंडी तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या साईड गटारीवर झालेली अतिक्रमणे आणि रस्त्यावर साठणारे पावसाचे पाणी यामुळे खड्ड़्यांचे वाढलेले प्रमाण आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन

आ. विखे यांनी या रस्त्याच्या कामासाठी गांभीर्याने पाठपुरावा सुरू केला आहे. पावसाळा आता थांबला असल्याने विलंब न करता नगर-मनमाड रस्त्याच्या साईड गटारीच्या कामाला प्रांरभ करा,

या मार्गाची हद्द निश्चित असल्याने सुप्रिम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे या मार्गावरील अतिक्रमण काढून टाकण्याबाबत गांभीर्याने कार्यवाही करून वाहतुकीसाठी मार्ग सुरळीत करून देण्याच्या सूचना आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

या मार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी इतर शासकीय यंत्रणेची मदत घेतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबतही आ.विखे पाटील यांनी अधिकार्‍यांना सांगितले.कोल्हार येथील पुलाच्या कामाबाबतही आ.विखे यांनी अधिकार्‍यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहे .

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News