अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- आमदार रोहित पवार यांच्या तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी लुटमारी, अवैध धंद्यांचे वाढते प्रमाण पाहता पोलिसांनी तालुक्यात धडक कारवाई सुरु केली आहे.
गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार जामखेड तालुक्यातील खर्डा, सोनेगाव, वाकी व राजुरी परिसरात छापे टाकून कल्याण हारजीत मटक्याचे साहित्य, देशी व विदेशी दारू बाॅक्स असे साडे अकरा हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहे व पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस उपअधिक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉ. सागर जंगम, पोलिस कॉ. आदित्य बेलेकर, पोलिस कॉ. संतोष जरे, पोलिस कॉ. दादाराव मस्के,
पोलिस कॉ. घोडके पोलिस कॉ. साबळे, पोलिस कॉ. केशव व्हरकटे यांनी कारवाई केली. अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी जिल्ह्यात सध्या पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
दरदिवशी धाड सत्र सुरूच ठेवण्यात आल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैद्य धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान पोलिसांनी तालुक्यातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून साडेअकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved