केंद्रीय कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात मोठी अपडेट!

केंद्रातील आणि राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात. 

Published on -

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कार्यरत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 55% दराने महागाई भत्ता मिळतोय. मात्र लवकरच हा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. यासोबतच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढणार आहे. 

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता किती वाढणार ?

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून सुधारित करण्यात आला आहे आणि आता जुलै 2025 पासून पुन्हा एकदा सुधारित होणार आहे. सध्या या नोकरदार मंडळीला 55% दराने महागाई भत्ता मिळतोय मात्र यामध्ये आता आणखी तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.

म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 58% वर पोहोचू शकतो आणि ही वाढ जुलै 2025 पासून लागू होईल. तथापि याचा शासन निर्णय दसरा किंवा दिवाळीच्या सुमारास जारी होईल. शासन निर्णय जारी झाल्यानंतर मग याचा प्रत्यक्षात लाभ मिळणार आहे.

पण ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे. नक्कीच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% वरून 58% झाल्यानंतर त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. 

राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढणार?

सध्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 53% इतका आहे. या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै 2024 मध्ये शेवटचा वाढवण्यात आला होता. पण आता हा महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून सुधारित केला जाणार असून याबाबतचा निर्णय लवकरच निर्गमित होईल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई पत्ता 55% इतका होणार आहे म्हणजेच महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढणार आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहील म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे.

तथापि, याबाबतचा शासन निर्णय जुलै महिन्यात निर्गमित होण्याची शक्यता आहे. म्हणजे जुलै महिन्याच्या पगारा सोबत अर्थातच जो पगार ऑगस्ट महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्या पगारांसोबत याचा म्हणजेच महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा प्रत्यक्षात लाभ मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!